पुण्यात मराठी चित्रपटाची उपेक्षा, सिंबामुळे 'भाई'ला मिळत नाही थिएटर

उद्या ( 4 जानेवारी ) भाई व्यक्ती की वल्ली हा पु.ल. देशपांडेंवरचा सिनेमा रिलीज होतोय. पण पुण्यात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमाला खेळ मिळावेत म्हणून झगडावे लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 01:45 PM IST

पुण्यात मराठी चित्रपटाची उपेक्षा, सिंबामुळे 'भाई'ला मिळत नाही थिएटर

पुणे, 03 जानेवारी : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातच मराठी चित्रपटांची उपेक्षा सुरू आहे. उद्या ( 4 जानेवारी ) भाई व्यक्ती की वल्ली हा पु.ल. देशपांडेंवरचा सिनेमा रिलीज होतोय. पण

पुण्यात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमाला खेळ मिळावेत म्हणून झगडावे लागत आहे. कारण सगळीकडे सिंबा सिनेमा सुरू आहे.  त्यांच्या निर्मात्यांचा वितरकांवर दबाव आहे. थिएटर चालकांना 'भाई' हवाय. कारण प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

यावर बोलताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबद्दल चीड व्यक्त केलीय. ते म्हणाले, सरकारनं कायदा करूनही दर शुक्रवारी मराठी चित्रपटाला झगडावं लागणं योग्य नाही. ते असंही म्हणाले, रोहित शेट्टीचा सिंबा चालतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी मराठी चित्रपटांवर अन्याय होणं बरोबर नाही.


यावर महेश मांजरेकरांचंही असंच म्हणणं पडलं. ते म्हणाले सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये मराठी प्रेक्षक जास्त येतात. पु.ल. देशपांडे प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या जवळचे. त्यामुळे त्यांना हा सिनेमा बघता आला पाहिजे. शिवाय सिंबा रिलीज होऊन आता एक आठवडा उलटलाय. तेव्हा इतर सिनेमांसाठी थिएटर मिळालं पाहिजे.

Loading...

या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचं आहे.

चित्रपटात पुलंची भूमिका सागर देशमुख साकारणार आहे.इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.पण सागर उमेदीच्या काळातले पुलं दाखवणार, तर सूत्रांच्या माहितीनुसार वयोवृद्ध पुलं साकारणार आहेत विजय केंकरे. आणि वृद्ध सुनीताबाई उभ्या करणार आहेत शुभांगी दामले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...