'गच्ची' सिनेमाचं ट्रेलर रिलीज

या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा एका गच्चीत शूट करण्यात आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 06:24 PM IST

'गच्ची' सिनेमाचं ट्रेलर रिलीज

07 डिसेंबर : प्रिया बापट आणि अभय महाजनची मुख्य भूमिका असलेल्या 'गच्ची' या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा एका गच्चीत शूट करण्यात आलाय.

खरंतर गच्ची ही प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी खास असते. या गच्चीवर आई कपडे वाळत घालते, तर काकू पापड वाळत घालते. कधी ही गच्ची प्रेमाचं प्रतिकही ठरते.मात्र आयुष्य संपवण्यासाठी गच्चीवर आलेल्या दोन व्यक्तींच्या आयुष्यात नक्की काय घडतं ते या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात प्रिया आणि अभयची धमाल मस्तीही आपल्याला पहायला मिळणार आहे.

नचिकेत सामंत दिग्दर्शित गच्ची हा सिनेमा येत्या 22 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आठवणीतली गच्ची म्हणजे गच्ची हा सिनेमा आता प्रेक्षकांवर काय जादू करतो हे बघणं आता महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...