आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज

आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज

‘सरसेनापती हंबीरराव’. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच रिलीज झालं ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : बॉलिवूड असो किंवा मग मराठी सिनेसृष्टी सध्या सगळीकडेच ऐतिहासिक सिनेमा आणि बायोपिकची चलती आहे. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमांची मालिका तयार करणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय जानेवारीमध्ये तान्हाजी हा सिनेमा रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. यातच आता एका नव्या सिनेमाची भर पडतेय. तो सिनेमा म्हणजे, ‘सरसेनापती हंबीरराव’. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच रिलीज झालं ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण त्यांचा हा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. सिने दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत ‘सरसेनापती हंबीरराव’ सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं.

‘सरेनापती हंबीरराव’ सिनेमाच्या या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात तलवार घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते, सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने उभे असलेले हंबीरराव एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात. त्यांच्या हातात असलेल्या तलवारीच्या पातीला लागलेले रक्त बघता एका झुंजार सरसेनापतीच्या शौर्याचा इतिहास प्रेक्षकांसमोर समोर मांडला जाणार आहे. ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहिलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक सिनेमा जून 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2020 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading