मराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर!

मराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर!

डाॅ. काशिनाथ घाणेकर म्हटलं की अद्वितीय नाटकांचा इतिहासच समोर उभा राहतो. त्यांच्या नुसत्या नावावरच हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. मराठी रंगभूमीवरचे हे सुपरस्टार आता मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहेत.

  • Share this:

मुंबई २१ जून : डाॅ. काशिनाथ घाणेकर म्हटलं की अद्वितीय नाटकांचा इतिहासच समोर उभा राहतो. त्यांच्या नुसत्या नावावरच हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. मराठी रंगभूमीवरचे हे सुपरस्टार आता मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहेत.  ‘आणि...काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून. आणि या भूमिकेचं शिवधनुष्य पेललंय सुबोध भावेनं. सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं.

हेही वाचा

'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा

प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड'!

या सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि सुमित राघवनही आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

सिनेमात 1960चा काळ जिवंत केलाय. काशिनाथ घाणेकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशी अजरामर नाटकं गाजवली. हे सगळं आपल्याला सुबोध भावेच्या रूपात पाहता येईल.

 

वायकाॅम18चा हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. आतापर्यंत मराठीत बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्यावरचे सिनेमे हिट झाले होते. सुबोध भावेनं टिळकांची भूमिका अप्रतिम केली होती. त्यामुळेच आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 05:09 PM IST

ताज्या बातम्या