मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'टेंशन नहीं लेने का..बिंदास....' प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा भन्नाट Video Viral

'टेंशन नहीं लेने का..बिंदास....' प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा भन्नाट Video Viral

नुकताच प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तर तिच्या या व्हिडिओवर   (Singer Vaishali Made Latest Video)कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

नुकताच प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तर तिच्या या व्हिडिओवर (Singer Vaishali Made Latest Video)कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

नुकताच प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तर तिच्या या व्हिडिओवर (Singer Vaishali Made Latest Video)कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

मुंबई, 5 एप्रिल- प्रसिद्ध गायिका वैशाली माडे (Singer Vaishali Made) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या लेकीसोबत भन्नाट रील्समुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तर तिच्या या व्हिडिओवर   (Singer Vaishali Made Latest Video)कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

वैशाली माडेनं तिच्या इन्स्टाला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जेवणावर ताव मारताना दिसत आहे. शिवाय तिच्या या व्हिडिओच्या मागे सिद्धार्थ जाधवचा एक लोकप्रिय डायलॉगचा आवज येत आहे. तो म्हणजे , तात्यासाहेब हे जर अस चालू राहिल तर...राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. वैशाली देखील यावर मस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

वाचा-'ब्लाउज विसरली का?' प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांची प्रतिक्रिया

वेशालीनं हा भन्नाट व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, टेंशन नहीं लेने का ...बिंदास खाने का...क्या बोलती पब्लिक...??? तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, सही बोला, टेंशन काय को लेने का.. मस्त खाने का........तर आणखी एकानं म्हटलं आहे की, मनापासून खा..टेंशन घेऊ नका...अनेकांनी तिच्या कॅप्शनचं कौतुक करत म्हटलं आहे की, तुम्ही एकदम बरोबर सांगितलं आहे.

वाचा-'लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण...' विशाल निकमचं सौंदर्यासोबत ब्रेकअप

गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आली होती. वैशाली माडेने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच विविध मराठी मालिकांच्या 'टायटल साँग'लाही आपला आवाज दिला आहे. तिच्या आवाजातील टायटल साँग आजही अनेक दर्शकांच्या जीभेवर रेंगाळतात.

गायिका वैशाली माडे मुळची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रहिवासी आहे. तिचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. त्यांनी 'झी' वाहिनीच्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील गायन स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. त्यानंतर मराठी चित्रपट विश्वात तिची लोकप्रियता चांगलीच वाढली.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment