थॅलेसेमिआग्रस्त मुलाचा मराठी सिनेमा 'हॅपी बर्थ डे'

थॅलेसेमिआग्रस्त मुलाचा मराठी सिनेमा 'हॅपी बर्थ डे'

शशांक शेंडे आणि अरूण नलावडे या अभिनय क्षेत्रातील दोन दिग्गजांना पहिल्यांदाच एकत्र आणणारा 'हॅपी बर्थ डे' हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय.

  • Share this:

20 नोव्हेंबर : शशांक शेंडे आणि अरूण नलावडे या अभिनय क्षेत्रातील दोन दिग्गजांना पहिल्यांदाच एकत्र आणणारा 'हॅपी बर्थ डे' हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. थॅलेसेमिआ म्हणजेच रक्ताचा कर्करोग झालेल्या एका मुलाची कथा या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल.

आपण सर्वच जण मोठ्या उत्साहाने आपला वाढदिवस साजरा करतो. मात्र हा वाढदिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा वाढदिवस आहे असं जर कळलं तर काय होईल? अशाच एका थॅलेसेमिआग्रस्त मुलाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आलीय.

निमेश किजबिले, अमरदीप ठोंबरे, सेजल घरत यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. तर नारायण गोंडाळ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. येत्या 24 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 01:30 PM IST

ताज्या बातम्या