युथफुल 'F.U.'चं टिझर लाँच

युथफुल 'F.U.'चं टिझर लाँच

एफयू म्हणजे फ्रेंडशिप अनलिमिटेड. 'दोस्तीसाठी कायपन' अशी सिनेमाची कॅचलाइन आहे.

  • Share this:

24 एप्रिल : महेश मांजरेकच्या 'F.U.' सिनेमाचं टिझर लाँच झालं. एफयू म्हणजे फ्रेंडशिप अनलिमिटेड.  'दोस्तीसाठी कायपन' अशी सिनेमाची कॅचलाइन आहे. 'सैराट'फेम आकाश ठोसरचा वेगळा अवतार या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

न संपणारी एनर्जी , रोमान्स ,तरुणाईचा अॅटिट्युड...  या वर्षातील सर्वात धमाकेदार अशा F.U. या चित्रपटाचा भव्य टिझर लाँच  सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडिया वर काही तासांत 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले. F.U. च्या या पहिल्याच लूकवर  प्रेक्षक  अक्षरशः फिदा झाले आहेत.

सैराटच्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. आकाशबरोबरच या  टिझरमध्ये  सत्या मांजरेकर , मयूरेश पेम , शुभम किरोडीयन , माधव देवचक्के ,पवनदीप ,वैदेही परशुरामी , संस्कृती बालगुडे , स्वामिनी वाडकर  या तरुण कलाकारांबरोबरच सचिन खेडेकर , मेधा मांजरेकर , शरद पोंक्षे , स्व. अश्विनी एकबोटे , भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांची फौज दिसते त्याचबरोबर बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत.

एफयूचं पहिलं पोस्टर सलमान खाननं ट्विट केलं होतं. आता हा टिझरही त्यानं ट्विट केलाय. सलमानची खास मैत्रीण लुलिया या लाँचला उपस्थित होती.

एफयू हा युथफुल सिनेमा आहे. तरुणांच्या विश्वातली सफर महेश मांजरेकर घडवतायत. परशाच्या या नव्या सिनेमाबद्दल फॅन्सना उत्सुकता आहे. तरुणाईची भाषा बोलणारा F.U. - Friendship Unlimited हा सिनेमा येत्या २ जूनला प्रदर्शित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading