मधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'

मधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'

‘एक निर्णय’ स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’  या आगामी चित्रपटाचे लेखन, निर्मिर्ती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विविधांगी भूमिका लीलया साकारणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी या चित्रपटाला दिग्दर्शकीय स्पर्श कसा दिला आहे हे पहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘एक निर्णय’ स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

‘माणसाने आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयावर आयुष्याचं घडणं अथवा बिघडणं अवलंबून असतं. तो एक निर्णय माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. याच अनुषंगाने एक कथा मी लिहिली, आणि आता ती ‘एक निर्णय’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ज्यांना आयुष्यात स्वतःसाठी एखादा महत्त्वाचा  निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अजून तो घेतला नाही त्या सगळ्यांसाठीच हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.

मधुरा व्यक्तिरेखेबद्दल सांगताना म्हणाली, 'या डाॅक्टरनं स्वत:ला कामाला पूर्ण वाहून दिलंय. ती जणू डाॅक्टर म्हणून जन्माला आलीय. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा स्वत:च्या कामाला महत्त्व द्यायला आवडतं. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक निर्णय घ्यायची वेळ येते. तेव्हा अनेकांच्या विरोधाला न जुमानता स्वत:साठी ती निर्णय घेते.' मधुरानं  स्वत:च्या भूमिकेबद्दल सांगतात त्यामागचा सस्पेन्सही कायम ठेवलाय.

सध्या सुबोध भावेची सिनेमांची गाडी सुसाट सुरू आहे. एक निर्णयमध्येही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. सुबोध आणि मधुराच्या फॅन्सना ही चांगली ट्रिट आहे.

First published: December 15, 2018, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading