ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं आज ( 19 डिसेंबर ) सकाळी निधन झालं.ते 61 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं.

  • Share this:

कोल्हापूर, 19 डिसेंबर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं आज  ( 19 डिसेंबर ) सकाळी निधन झालं.ते 61 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. चित्रपटसृष्टीत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिगदर्शन केले होते.नाथा पुरे आता,राजमाता जिजाऊ,लेक लाडकी,हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. पैज लग्नाची या चित्रपटाला 14 पुरस्कारही मिळाले होते. 'घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.'राजा पंढरीचा’ या भक्तिपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाले होते. त्यांचा राजमाता जिजाऊ सिनेमा लंडनमध्येही रिलीज झाला होता.

जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता.नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता.रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होतं.

त्यांनी तांबडी माती आणि सोंगाड्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं. 1981मध्ये डाळिंबी सिनेमात त्यांनी सहय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

First published: December 19, 2018, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading