'बालगंधर्व'ची दशकपूर्ती; सुबोध भावेनं दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा

'बालगंधर्व'ची दशकपूर्ती; सुबोध भावेनं दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा

(Subodh Bhave)सुबोधने बालगंधर्व(Balgandharv) मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस या महान कलाकाराची भूमिका पार पाडली आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे-  सुबोध भावेला(Subodh Bhave) एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. सुबोधने आजपर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे. आणि अनेक दमदार भूमिका पार पाडल्या आहेत. सुबोधच्या अभिनय कारकिर्दीतील असाच एक मैलाचा दगड समजला जाणारा चित्रपट म्हणजे ‘बालगंधर्व’(Balgandharv) होय. आज या चित्रपटाला तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सुबोधने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो(Subodh's Instagram Post ) शेयर करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आणि या चित्रपटाचे आपले अनुभवसुद्धा शेयर केले आहेत.

सुबोध भावेने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. त्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. या प्रत्येक भूमिकेतून आपली छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे. ‘बालगंधर्व’ हा एक असाच चित्रपट आहे. सुबोधने बालगंधर्व मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या महान कलाकाराची भूमिका पार पाडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

सुबोधनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे, ‘"गंधर्वगाथा" हे भा.द.खेर लिखित पुस्तक पुस्तक वाचून सुरू झालेला प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटाद्वारे संपन्न झाला.६ मे २०११ रोजी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं,आज बालगंधर्व चित्रपटाचा १० वा वाढदिवस.संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला.त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो.

(हे वाचा: ...निकाल धक्कादायक’, मराठा आरक्षण निर्णयावर दिग्दर्शकाने व्यक्त केला रोष)

झपाटल्यासारख काम करणं म्हणजे काय असतं ते या चित्रपटाच्या उत्तम टीम मुळे अनुभवास आलं. अनेक कडू गोड प्रसंग या चित्रपटाने वाट्यास आले पण आयुष्यभर लक्षात राहील तो कादंबरी वाचल्यापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासातील आनंद हा अवर्णनीय आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट करावासा वाटला त्या "बालगंधर्व" आणि त्यांच्या समकालीन सर्व दिग्गजांना मनापासून अभिवादन आणि ज्यांच्या बरोबर हा प्रवास केला त्या माझ्या अतिशय लाडक्या टीम वर मनापासून प्रेम’. अशा पद्धतीने सुबोधने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

(हे वाचा:मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी  )

अभिनेता नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच ‘बालगंधर्व’ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. 20 व्या शतकातील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता म्हणून बालगंधर्व यांना ओळखलं जातं होतं. ‘बालगंधर्व’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी ‘बालगंधर्व’ ही मुख्य भूमिका साकारली आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 6, 2021, 4:19 PM IST

ताज्या बातम्या