Home /News /entertainment /

श्रिया पिळगांवकरने बॉलीवूडमधील 'मानधनाच्या' मुद्द्यावर उठवला आवाज, पाहा नेमकं काय घडलं...

श्रिया पिळगांवकरने बॉलीवूडमधील 'मानधनाच्या' मुद्द्यावर उठवला आवाज, पाहा नेमकं काय घडलं...

बॉलीवूडमध्ये नेहमीच नेपोटीझमवर वाद-विवाद होतं असतात. सोशल मिडियावर हा मुद्दा सतत चर्चेत असतो. मात्र त्याबरोबरचं अजून एक मुद्दा सतत वादाचा विषय बनलेला असतो. तो मुद्दा म्हणजे बॉलीवूड कलाकारांचे मानधन हा होय.

    मुंबई, 29 मार्च : बॉलीवूडमध्ये नेहमीच नेपोटीझमवर वाद-विवाद होतं असतात. सोशल मीडियावर हा मुद्दा सतत चर्चेत असतो. मात्र त्याबरोबरचं अजून एक मुद्दा सतत वादाचा विषय बनलेला असतो. तो मुद्दा म्हणजे बॉलीवूड कलाकारांचे मानधन हा होय. यावरचं आत्ता आवाज उठविला आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिनं. बॉलीवूड मधील कलाकारांच्या मानधनाबद्दल बोलताना श्रियानं म्हटलं आहे. बॉलीवूड मध्ये जेन्डर बघून देण्यात येतं असलेल्या मानधनाची पद्धत आधी बंद झाली पाहिजे. बॉलीवूडमध्ये यासाठी आधी काम झालं पाहिजे. तसचं ती म्हणते एखाद्या अभिनेत्याला इतक गडगंज मानधन दिलं जातं. की जेवढा एखाद्या नायिका केंद्रित चित्रपटाचा पूर्ण बजेट असतो.
    श्रिया पिळगावकर लवकरच बॉलीवूड चित्रपट 'हाथी मेरे साथी' मध्ये झळकणार आहे. माध्यमांशी बोलताना श्रियानं म्हटलं आहे. की मी मोठ-मोठ्या अभिनेत्रींच्या कडून असं ऐकलं आहे. की अनेक अभिनेत्यांना इतकं मानधन देण्यात आलं आहे. की जितकं त्यांच्या संपूर्ण चित्रपटाचं बजेट असतं. त्याचबरोबर ती पुढं म्हणते की जरी तुम्हाला हे माहित नसलं की तुमचा सह-कलाकार किती कमवत आहे. तरी तुम्ही चित्रपटाच्या प्रगतीवरून तो अंदाज लावू शकता. (हे वाचा:सोफियानं बिकिनीमध्ये केली रंगांची उधळण; बोल्ड PHOTO होतायेत व्हायरल   ) स्वतःबद्दल बोलताना श्रिया म्हणते, मला स्वतःला सुद्धा माहिती नाही की माझा सह-अभिनेत्याला किती पैसा मिळत आहे. मात्र इथून पुढे मी माझा क्षमतेवर योग्य तो व्यवहार करेन. स्वतः साठी ठाम बाजू घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण आपली बाजू उचलून धरेन तेव्हाचं या गोष्टी चांगल्या होतील. जेव्हा आपण स्वतःला महत्व देईन. तेव्हाचं इतर लोकं आपल्याला महत्व देतील अन्यथा नाही.  श्रियाही प्रसिद्ध मराठी-हिंदी अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे. श्रिया ‘हाउस अरेस्ट’ फनसारख्या चित्रपटात झळकली होती. त्याचबरोबर ती ‘मिर्झापूर’सारख्या विविध वेबसिरीजमध्ये सुद्धा दिसुन आली आहे.श्रियानं अनेक लघुपटांमध्येसुद्धा भूमिका साकारली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress

    पुढील बातम्या