Home /News /entertainment /

‘मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलर्सला मानसी नाईकचं सडेतोड उत्तर

‘मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलर्सला मानसी नाईकचं सडेतोड उत्तर

काही वेळेस बोल्ड फोटोंमुळं तिच्यावर टीका देखील केली जाते. (Manasi Naik Slam Trollers) अशीच काहीशी टीका एका नेटकऱ्यानं तिच्यावर केली होती. तिला त्यानं बुधवार पेठेत पाहिलंचं त्यानं म्हटलं. या ट्रोलरला मानसीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 28 एप्रिल: मानसी नाईक (Manasi Naik) ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जबरदस्त डान्स आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं असं एक स्थान निर्माण केलं आहे. मानसी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. काही वेळेस बोल्ड फोटोंमुळं तिच्यावर टीका देखील केली जाते. (Manasi Naik Slam Trollers) अशीच काहीशी टीका एका नेटकऱ्यानं तिच्यावर केली होती. तिला त्यानं बुधवार पेठेत पाहिलंचं त्यानं म्हटलं. या ट्रोलरला मानसीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मानसीनं आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी एक लाईव्ह चॅट सेशन केलं होतं. त्यामध्ये तिनं ट्रोलिंगचा अनुभव सांगताना या टीकाकाराला फैलावर घेतलं. ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वी माझ्या एका फोटोवर यूझरनं मी बुधवार पेठेतील आहे अशी कमेंट केली होती. ती कमेंट पाहून मला हसूही आलं आणि वाईट ही वाटलं. इमरान हाशमीच्या Video नं केला विक्रम; काही दिवसात मिळवले 5 कोटी व्ह्यूज 
  View this post on Instagram

  A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

  त्या युझरला प्रत्युत्तर देताना मानसी म्हणाली, “तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? आणि तुम्ही तिथं काय करत होता? बुधवार पेठ ही जागा ज्या बायका चालवतात त्या बायका स्वत:चं पोट भरण्यासाठी काम करतात. प्रामाणिकपणे काम करतात. ‘पण दुसऱ्यांना आशा भाषेत शिव्या घालून तुम्हाला काय मिळतं?” बुधवार पेठ हा पुण्यातील रेड-लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महिला वेश्या व्यवसाय करतात. या पार्श्वभूमीवर मानसीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Social media troll

  पुढील बातम्या