मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पडद्यावर सईच्या प्रेमात असलेल्या आदित्यला शिवानी म्हणतेय 'माझा होशील ना'?

पडद्यावर सईच्या प्रेमात असलेल्या आदित्यला शिवानी म्हणतेय 'माझा होशील ना'?

विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळेनं (shivani rangole) सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नात (Marriage) नुकतीच हजेरी लावली होती. या लग्नात त्यांनी मॅचिंग कपडेही घातले होते.

विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळेनं (shivani rangole) सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नात (Marriage) नुकतीच हजेरी लावली होती. या लग्नात त्यांनी मॅचिंग कपडेही घातले होते.

विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळेनं (shivani rangole) सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नात (Marriage) नुकतीच हजेरी लावली होती. या लग्नात त्यांनी मॅचिंग कपडेही घातले होते.

मुंबई, 26 जानेवारी: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नुकतंच लग्न केलं आहे. त्यामुळे सिनेसृष्टीसोबतच सोशल मीडिया यांच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण यांच्या लग्नात उपस्थित असलेल्या एका जोडप्याबद्दलही आता सोशल मीडियात गुजबूज सुरू झाली आहे. आणि ही जोडी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मराठी चित्रपट सृष्टीतला गुणी अभिनेता विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) यांची ही जोडी आहे.

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नात विराजस आणि शिवानीने एकत्र हजेरी लावली होती. आणि विशेष म्हणजे त्यांनी लग्नात घातलेले कपडे मॅचिंग होते. त्यामुळे त्यांच्या दोघांत प्रेमसंबंध सुरू असल्याच्या वावड्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उठवल्या जात आहेत. खंरतर गेल्या अनेक दिवसांपासून ही जोड बऱ्याचदा सार्वजानिक ठिकाणी एकत्र जाते. तसंच शिवानीने आणि विराजसने एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता यांच्या प्रेमाबद्दल पक्का संशय आला आहे. मात्र अद्याप शिवानीने अथवा विराजसने याबाबत काही स्पष्ट केलेलं नाही.

हे वाचा - सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे गुपचूप करतेय लग्न? PHOTO VIRAL

गेल्या काही दिवसांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी 2020 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने दोघांचा एकत्रित फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने 'Yup' असं कॅप्शन दिलं होतं. शिवाय तिने या फोटोसोबत एक हार्ट इमोजीदेखील पोस्ट केला होता. त्यामुळे तेव्हापासून ही जोडी एकमेकांच्या प्रेमात अडकली असल्याचं म्हटलं जात आहे.

हे वाचा - प्रियांका चोप्राला फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्याचं दुःख; म्हणाली...

विराजस आणि शिवानीची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. विराजस हा अभिनेत्यासोबतच उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. शिवानीने विराजसच्या 'डावीकडून चौथी बिल्डींग' या नाटकात काम केलं होत. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. शिवानी सध्या 'सांग तू आहेस ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment