मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या फोटोतला गोंडस मुलगा ओळखलात का? आता आहे मराठीतला चॉकलेट हिरो

या फोटोतला गोंडस मुलगा ओळखलात का? आता आहे मराठीतला चॉकलेट हिरो

सध्या सोशल मीडियावर एका लहान  गोंडस मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमरेवर हात ठेवून निरागसपने बघत असलेलला हा मुलगा कोण आहे? ओळखला का तुम्ही? हा गोंडस मुलगा आहे.

सध्या सोशल मीडियावर एका लहान गोंडस मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमरेवर हात ठेवून निरागसपने बघत असलेलला हा मुलगा कोण आहे? ओळखला का तुम्ही? हा गोंडस मुलगा आहे.

सध्या सोशल मीडियावर एका लहान गोंडस मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमरेवर हात ठेवून निरागसपने बघत असलेलला हा मुलगा कोण आहे? ओळखला का तुम्ही? हा गोंडस मुलगा आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4मार्च: सध्या सोशल मीडियावर एका लहान गोंडस मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कमरेवर हात ठेवून निरागसपणे बघत असलेलला हा मुलगा कोण आहे? ओळखला का तुम्ही? हा गोंडस मुलगा आहे. मराठीतला लाडका अभिनेता, चॉकलेट हिरो अशी बिरुदं मिळालेला सुपरस्टार स्वप्नील जोशी आहे हा.नुकताच स्वप्नीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या बालपणीचा हा फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आणि त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

स्वप्नील हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि नावाजलेला अभिनेता समजला जातो. त्याचबरोबर स्वप्नीलला एक रोमांटिक अभिनेता समजलं जातं. अनेक तरुणी स्वप्नीलवर फिदा आहेत. स्वप्नीलचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. अशा आपल्या लाडक्या अभिनेत्याचा हा बालपणीचा देखणा आणि निरागस फोटो पाहून चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by (@swwapnil_joshi)

स्वप्नील जोशीचा जन्म मुंबईमध्येच झाला आहे. त्याने आपले शालेय शिक्षणसुद्धा मुंबईमधील एका शाळेत घेतले आहे. त्यांनतर स्वपिलने आपले महाविद्यालयीन शिक्षण कॉमर्समधून घेतले आहे. स्वप्नीलने 2005 मध्ये दंतवैद्य असलेल्या अपर्णा या मुलीशी लग्नं देखील केलं होतं. मात्र ते फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनतर स्वप्नीलने लीना हिच्याशी  दुसरं लग्न केलं.

स्वप्नीलच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अगदी बालवयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. स्वप्नीलने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी 'उत्तर रामायण' या टीव्ही वरील मालिकेत रामपुत्र 'कुश' ची भूमिका साकारली होती. त्यामुळे स्वप्नील हा बालपणी पासूनच अभिनयाचा वसा चालवत आहे. त्यानंतर स्वप्नीलने 'श्रीकृष्ण' या हिंदी मालिकेमध्ये भगवान 'श्रीकृष्णाची' भूमिकादेखील साकारली होती.

स्वप्नीलने मराठी चित्रपट सृष्टीत अनेक सुप्रसिद्ध चित्रपट केले आहेत. त्यानंतर मालिका, निवेदक, अनेक कार्यक्रमांत परीक्षक म्ह्नुनंही त्यानं काम केलं आहे.

मराठी चित्रपटांत सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या अभिनेत्रींसोबत त्याची जोडी खास पसंत केली जाते. सई सोबत दुनियादारी, प्यारवाली लवस्टोरी, या चित्रपटांतून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तर मुक्ता सोबत मुंबई -पुणे-मुंबई चित्रपटांत तर प्रेक्षकांनी अक्षरशः या जोडीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर या चित्रपटाचे 2 भाग सुद्धा तयार करण्यात आले.

अशाप्रकारे अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या या अभिनेत्याच्या बालपणीच्या या गोंडसं फोटोला देखील तितकचं प्रेम मिळत आहे.

First published:

Tags: Actor, Marathi entertainment, Swapnil joshi