Home /News /entertainment /

'या' चित्रपटासाठी घेतलं होतं फक्त 1 रुपये मानधन; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अजब किस्सा

'या' चित्रपटासाठी घेतलं होतं फक्त 1 रुपये मानधन; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अजब किस्सा

लक्ष्मीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच हाउसफुलची पावती दिली होती.

    मुंबई, 17 जून- लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक महान व्यक्तिमत्व होय. त्यांनी आपल्या विनोदाने सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडलं होतं. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच हाउसफुलची पावती दिली होती. अशा या अष्टपैलू अभिनेत्याबद्दल आपण आज एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क एका चित्रपटासाठी फक्त एक रुपया मानधन घेतलं होतं. वाटलंना आश्चर्य? हो हे खरं आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. मात्र ते खासकरून मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नेहमीच खळखळून हसवल आहे. या अभिनेत्याला मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण ‘लक्ष्या’ म्हणूनचं बोलवतात. कारण तो प्रत्येकांना आपलासा वाटतो. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबत मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आणि नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (हे वाचा:सोशल मीडियावर तुफान VIRAL झालेली ही जोडी आहे तर कोण? वाचा सविस्तर   ) अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या चित्रपटांत लक्ष्मीकांत बेर्डे यांना विशेष स्थान असायचं. महेश कोठारे यांनी दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी पहिला चित्रपट केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे तितकसं बजेट नव्हतं. त्यांनी लक्ष्मीकांत यांना आपल्या चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यांच्या हातात एक रुपया दिला. तो एक रुपया लक्ष्मीकांत यांनी आनंदाने स्वीकारला आणि संपूर्ण चित्रपट एक रुपये मानधनावर केला होता. (हे वाचा:VIDEO: शकूने नलूला दिलं खास सरप्राईज; पाहून स्वीटूचं कुटुंब झालं भावुक   ) कोणता होता हा चित्रपट? हिंदी चित्रपट ‘प्यार किये जा’ चा रिमेक म्हणजेच ‘धुमधडाका’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. हा महेश कोठारे यांनी पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट आहे. यावेळी ते कलाकारांची शोधशोध करत होते. मूळ हिंदी चित्रपटात मेहमूद यांची भूमिका होती. त्या भूमिकेसाठी मराठीमध्ये त्यांना त्या ताकतीचा अभिनेता हवा होता. महेश कोठारे एकदा आपल्या आईवडिलांच्या नाटकासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत यांना अभिनय करताना पाहिलं, आणि त्यांना त्यांचा अभिनय जाम भावला. आणि त्यांनी लगेच त्यांच्याशी बोलून त्यांना तो रोल ऑफर केला. आणि हा चित्रपट सुपरहिटसुद्धा झाला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या