मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी आणि अंकुश होतो जुळे भाऊ', पाहा भरत जाधवच्या पहिल्या चित्रपटाचा भन्नाट किस्सा PHOTO

'मी आणि अंकुश होतो जुळे भाऊ', पाहा भरत जाधवच्या पहिल्या चित्रपटाचा भन्नाट किस्सा PHOTO

नुकताच भरतने(Bharat Jadhav) आपल्या पहिल्या चित्रपटाचा फोटो शेयर(Photo Post On instagram) करत एक भन्नाट आठवण सांगितली आहे.

नुकताच भरतने(Bharat Jadhav) आपल्या पहिल्या चित्रपटाचा फोटो शेयर(Photo Post On instagram) करत एक भन्नाट आठवण सांगितली आहे.

नुकताच भरतने(Bharat Jadhav) आपल्या पहिल्या चित्रपटाचा फोटो शेयर(Photo Post On instagram) करत एक भन्नाट आठवण सांगितली आहे.

  मुंबई, 6 मे : मराठीतील अष्टपैलू अभिनेता (Marathi Actor) म्हणून भरत जाधव (Bharat Jadhav) यांना ओळखलं जातं. भरतने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. भरत जाधव प्रामुख्याने विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या विनोदच्या जोरावर भरतने प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड निर्माण केली आहे. भरत सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. नुकताच भरतने आपल्या पहिल्या चित्रपटाचा फोटो शेयर (Photo Post On instagram) करत एक भन्नाट  आठवण सांगितली आहे. पाहूया ती आठवण नेमकी काय आहे. भरत जाधव सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या जुन्या चित्रपटांचे फोटो शेयर करत, त्याच्याशी संबंधित अनेक किस्से सुद्धा शेयर करत असतो. नुकताच भरतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तो अतिशय तरुण दिसत आहे. पाहूनचं हा फोटो अगदी जुना असल्याचं लक्षात येतं आहे. या फोटोमध्ये अभिनेता अंकुश चौधरीसुद्धा दिसून आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

  तर हा फोटो पोस्ट करत भरतनं म्हटलं आहे, हा फोटो त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटातील आहे. ‘लक्ष्मी’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. मात्र यामध्ये भरतला मुख्य भूमिका नव्हती. तर त्याने एक छोटीशी भूमिका यात साकारली होती. मात्र या चित्रपटाचं वैशिट्य असं आहे, की या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि भरतने चक्क जुळ्या भावांची भूमिका साकारली आहे. (हे वाचा: बिग बॉस फेम राहुल वैद्यचं Facebook अकाऊंट हॅक; पोस्ट झाले विचित्र VIDEO  ) भरत जाधवने आजपर्यंत अनेक नाटक, एकांकिका, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. सही रे सही, ऑल द बेस्ट, आमच्यासारखे आम्हीच, श्रीमंत दामोदर पंत ही त्याची प्रचंड गाजलेली नाटके आहेत. ‘सही रे सही’ या नाटकाचे तर एका वर्षात चक्क 565 प्रयोग झाले होते. या नाटकाची नोंद ‘गिनीज बुक’ मध्ये झाली आहे. (हे वाचा:'ते सगळं ठिकाय पण याचा मास्क कुठाय', रक्तदान करायला गेलेला सोनू निगम होतोय ट्रोल  ) तसेच भरतने खबरदार, गलगले निघाले, पछाडलेला, बकुळा नामदेव घोटाळे, साडे माडे तीन अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या