मुंबई, 17 मार्च: चित्रपटसृष्टीत (film industry ) गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण गेल्या आठवडाभरात अनेक कलाकारांना कोरोनाची (corona)लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेली वर्षभर लॉकडाऊनमुळे (lokdown)बंद असलेल्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या शूटिंगला (shooting) सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आता मराठी सेलिब्रिटी कपलही कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे.
मराठी अभिनेता उमेश कामत (umesh kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट(priya bapat) या जोडप्याचा कोरोना रिपोर्टा नुकताच कोरोना पॉझिटीव्ह (corona positive) आला आहे. आपण दोघंही कोरोना पॉझिटिव्ह आहोत अशी माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. उमेश कामतने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे.
त्याचबरोबर उमेश आणि प्रियानं काळजीचं कारण नसल्याचंही सांगितलं आहे. सध्या ते होम क्वारंटाईन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच कोरोनाच्या अनुषंगाने हवी ती योग्य खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या जोडप्यानं गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आणि आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
हे वाचा: धर्मेंद्र ते शाहरुख खान.. पाहा कमी वयात लग्न करणाऱ्या कलाकारांचे दुर्मिळ PHOTO
मराठी मधील लोकप्रिय असणाऱ्या या कलाकार जोडीनं नुकताच आपल्या ‘आणि काय हवं?’ या गाजलेल्या वेबसीरीजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे चाहते खूपच आनंदी झाले होते आणि मोठ्या आतुरतेने या वेबसीरीजची वाट पाहात होते. त्याचबरोबर उमेश ’दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकातसुद्धा काम करत होता. मात्र आज ही माहिती कळताच चाहत्यांना मोठा दुख झाला असून आपल्या लाडक्या कलाकारांची काळजी सुद्धा लागून राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Priya bapat