मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मृण्मयी देशपांडे दिसणार होस्टच्या भूमिकेत; लवकरच येतोय 'मराठी सारेगमप लिटल चॅम्प'

मृण्मयी देशपांडे दिसणार होस्टच्या भूमिकेत; लवकरच येतोय 'मराठी सारेगमप लिटल चॅम्प'

मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री, गायिका आणि दिग्दर्शिका आहे.

मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री, गायिका आणि दिग्दर्शिका आहे.

मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री, गायिका आणि दिग्दर्शिका आहे.

मुंबई, 10 जून- अभिनेत्री(Actress)  मृण्मयी देशपांडेने(Mrunmayee Deshpande) आपल्या मोहक रूपाने आणि उत्तम अभिनयाने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे. मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री, गायिका आणि दिग्दर्शिका आहे. आत्ता मृण्मयी होस्ट(Host) म्हणून आपल्या भेटीला येणार आहे. लवकरच छोट्या पडद्यावर मराठी सारेगमप लिट्ल चम्प सुरु होतं आहे. यामध्ये मृण्मयी होस्टची धुरा सांभाळणार आहे. चाहतेही तिला पुन्हा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

झी मराठीवर सारेगमप लिटल चम्प सुरु होतं आहे. अनेक बालचमूंना यामध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची संधी मिळणार आहे. तर दुसरीकडे कधीकाळी ही स्पर्धा गाजवणारे आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरी म्हणून दिसून येणार आहेत. मृण्मयी नेहमीच आपल्या बोलक्या स्वभावाने सर्वांचंच मनमोहून घेते. त्यामुळे तिला होस्टच्या रुपात बघणं खुपचं कौतुकाचं असणार आहे.

(हे वाचा:VIDEO: नवी वकील देविसिंगला फासावर लटकवणार? की फसणार डॉक्टरच्या जाळ्यात?   )

मृण्मयी सध्या सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपल्या खाजगी गोष्टीही चाहत्यांशी शेयर करत असते. मृण्मयी एक उत्तम गायिकासुद्धा आहे. हे वारंवार आपल्याला पाहायला मिळत. तिनं शास्त्रीय संगीताचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे. ती मिळालेल्या फावल्या वेळेत आपल्या गाण्याचा छंद जोपासत असते. तिचे गाण्याचे व्हिडीओदेखील सतत सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. यामध्ये तिला साथ देत असते, तिची लाडकी लहान बहीण आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे. या दोघी बहिणी सतत आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. त्यामुळे एका सिंगिग शोमध्ये गाण्याची पुरेपूर समज असणारी होस्ट असणं हे खुपचं उत्तम आहे.

(हे वाचा:फॅमिली मॅन 3'ची स्क्रिप्ट तयार, Lockdown नंतर सुरु होईल काम': मनोज वाजपेयी  )

मृण्मयीने आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून आपलं कौशल्य दाखवलं आहे. मृण्मयीने कट्यार काळजात घुसली, नटसम्राट सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. त्यामुळे आत्ता तिला होस्टच्या भूमिकेमध्ये पाहणे तितकचं महत्वाचं आणि औस्तुक्याचं असणार आहे.

First published:
top videos