मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: लवकरच होणार 'देवमाणूस' ची एक्झिट; तर ही नवी मालिका करणार एन्ट्री

VIDEO: लवकरच होणार 'देवमाणूस' ची एक्झिट; तर ही नवी मालिका करणार एन्ट्री

देवमाणूस मालिका लवकरच आपल्या सर्वांचा निरोप(Off Air) घेणार असून या मालिकेची(New Serial) जागा एक नवी हॉरर मालिका घेणार आहे.

देवमाणूस मालिका लवकरच आपल्या सर्वांचा निरोप(Off Air) घेणार असून या मालिकेची(New Serial) जागा एक नवी हॉरर मालिका घेणार आहे.

देवमाणूस मालिका लवकरच आपल्या सर्वांचा निरोप(Off Air) घेणार असून या मालिकेची(New Serial) जागा एक नवी हॉरर मालिका घेणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 20 जुलै- ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहते अगदी खिळून राहतात. मालिकेप्रमाणेचं यातील कलाकारसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेमुळे प्रत्येक कलाकाराला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. आत्ता ही मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही मालिका लवकरच आपल्या सर्वांचा निरोप (Off Air) घेणार असून या मालिकेची (New Serial) जागा एक नवी हॉरर मालिका घेणार आहे.

झी टीव्हीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. या मालिकेच्या कथानकाने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील डॉक्टर उर्फ अजितकुमार देवच्या थरारक कारस्थानांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित होती. मालिकेत डॉक्टरने अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. अनेक निर्दोष महिलांना त्रास दिला आहे. आत्ता यासर्व कट कारस्थानांचा लवकरच भांडा फुटणार आहे. आणि यासोबतचं ही मालिका आपला निरोप घेणार आहे.

सध्या मालिकेत डॉक्टर कोर्टातून निर्दोष सुटला आहे. मात्र तिचा भूतकाळ म्हणजेच चंदा ही त्याच्या आयुष्यात परतली आहे. त्यामुळे डॉक्टर जाम घाबरला आहे. आणि पूर्ण गोंधळून गेला आहे. आत्ता चंदा डॉक्टरचं सत्य सर्वांसमोर आणायला पोलिसांना मदत करणार असंचं दिसत आहे. मालिकेत लवकरच डॉक्टरला फाशी होणार आहे. आणि यासोबतचं ही मालिका एक्झिट घेणार आहे.

(हे वाचा:शिल्पाचा पती नेमका आहे तरी कोण? का झाला होता पहिल्या पत्नीशी तलाक)

या मालिकेची जागा घेण्यासाठी एक नवी मालिका सज्ज आहे. लवकरचं झी मराठीवर ‘ती परत आलीये’ ही हॉरर मालिका आपल्या भेटीला येणार आहे. देवमाणूसची जागा आत्ता ही मालिका घेणार आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. त्यावरून ही मालिका हॉरर असल्याचं दिसत आहे. ही मालिका रात्री 10.30 वाजता म्हणजेचं ‘देवमाणूस’ च्या वेळेलाचं प्रसारित होणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial