झी मराठीवर ‘ती परत आलीये’ ही थरारक मालिका सुरु झाली आहे. या मालिकेने सर्वांचाचं थरकाप उडवला आहे. मालिकेत दररोज नवनवीन प्रसंग घडत असतात. या थरारक घटनांनमुळे प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाचं चुकतो. मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षक खिळून राहिले आहेत. मालिकेत दाखवण्यात आलेली ती पार्टी आणि त्यामध्ये ग्रुपमधील एका मैत्रिणीने गमावलेला जीव. आणि त्याच्या 10 वर्षानंतर सुरु झालेला हा चित्तथरारक प्रवास सर्वांनच्याच पसंतीस उतरला आहे. (हे वाचा: इमली'च्या चाहत्यांना मोठा धक्का; 'या' मुख्य कलाकाराची मालिकेतून एक्झिट) मालिकेत तब्बल 10 वर्षानंतर या मित्रांना पुन्हा एकत्र आणलं जात. आणि तेही नेमकं त्याचं ठिकाणी जिथे 10 वर्षांपूर्वी त्यांच्या मैत्रिणीचा अपघाती जीव गेला होता. मात्र त्यांना एकत्र कोण आणत ते कसे येतात आणि त्या भयानक जंगलातील फार्म हाउसमध्ये अडकतात हे कोणालच समजत नाही. त्या फार्म हाउसमध्ये आल्यानंतर त्यांना बाबुराव नावाचा एक माणूस भेटतो जो त्या फार्म हाउसमध्ये काम करत असतो. (हे वाचा:'फुलाला सुगंध मातीचा'च्या कलाकारांच्या आयुष्यात 'हे' लोक आहेत खास ) मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये या बाबूरावची बॉडी अगदी चिखलात माखलेली जंगलात आढळली आहे. आत्ता खरच त्याचा खून झाला आहे. की तो दारू पिऊन पडला आहे. हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र जर बाबुरावचा खून झाला असेल तर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. इतकी दमदार भूमिका इतक्या लवकर एक्झिट घेऊ नये असे प्रेक्षकांना वाटतं आहे. ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.