मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आदित्य-सईबरोबर ब्रह्मे बॉइजही पोहोचले मनालीला; बसमधला VIDEO झाला VIRAL

आदित्य-सईबरोबर ब्रह्मे बॉइजही पोहोचले मनालीला; बसमधला VIDEO झाला VIRAL

आता मराठी मालिकांचं शूटिंगही निसर्गरम्य लोकेशन्समध्ये होऊ लागलं आहे. मनालीला शूटिंगसाठी निघालेल्या Gautami Deshpande म्हणजे सईने आदित्यच्या मामांसोबत म्हणजेच अभिनेता सुनील तावडे (sunil tawade) काय धम्माल केली पाहा, हा VIDEO

आता मराठी मालिकांचं शूटिंगही निसर्गरम्य लोकेशन्समध्ये होऊ लागलं आहे. मनालीला शूटिंगसाठी निघालेल्या Gautami Deshpande म्हणजे सईने आदित्यच्या मामांसोबत म्हणजेच अभिनेता सुनील तावडे (sunil tawade) काय धम्माल केली पाहा, हा VIDEO

आता मराठी मालिकांचं शूटिंगही निसर्गरम्य लोकेशन्समध्ये होऊ लागलं आहे. मनालीला शूटिंगसाठी निघालेल्या Gautami Deshpande म्हणजे सईने आदित्यच्या मामांसोबत म्हणजेच अभिनेता सुनील तावडे (sunil tawade) काय धम्माल केली पाहा, हा VIDEO

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 एप्रिल- मराठी मालिकांमध्ये (Marathi serial Maza hoshil na) सुद्धा आता बराच बदल पाहायला मिळत आहे. आपला गाव, आपली संस्कृती जपत सध्याच्या काळानुसार त्या रुळत आहेत. मराठी मालिकांचे सुद्धा चित्रिकरण विविध ठिकाणी होऊ लागले आहे. आज आपण बोलत आहोत, ‘माझा होशील ना?’ (maza hoshil na) या मालिकेबद्दल. या मालिकेचं चित्रिकरण नुकतंच निसर्गरम्य, बर्फाळ अशा मनालीमध्ये (manali) पार पडलं. आणि या ट्रीप दरम्यानचा बसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये सई (Gautami deshpande)आणि आदित्यचे (Virajas Kulkarni) मामा दिसून येत आहेत.

झी मराठी वाहिनीवर सध्या ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रक्षेपित होते. मालिकेच्या सुरुवातीपासूनच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चाहते या मालिकेला भरभरून दाद देत आहेत. या मालिकेमध्ये सई ही हट्टी, आईवडिलांची एकुलती एक मुलगी, सुखाने लाडावलेली अशी दाखविण्यात आली आहे. तर त्याविरुद्ध आदित्य हा अतिशय समंजस, आहे त्या गोष्टीत समाधान मानणारा, आपल्या मामांसोबत म्हणजेच ब्रह्मे कुटुंबांसोबत राहणारा असा दाखविण्यात आला आहे. आदित्य आणि सईमध्ये बरीच उंदीर मांजरांची भांडणे दाखविण्यात आली होती. त्यांनतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि इथून सुरु होतो त्यांच्या प्रेमाचा प्रवास. बऱ्याच अडचणींवर मात करत मालिकेत शेवटी याचं लग्नं झालं आहे. हा लग्नाचा सोहळा सुद्धा चाहत्यांमध्ये खूपचं लोकप्रिय झाला होता. आता मालिका लग्नानंतरच्या टप्प्यात आहे.

आत्ता या लग्नानंतर सई आणि आदित्य यांनी हनिमूनसाठी थेट मनाली गाठली आहे. मात्र हे एकटे नाहीत हा. यांच्यासोबत आदित्याचे सगळे मामा म्हणजे सगळे ब्रह्मेसुद्धा आहेत. सई आणि आदित्यचं हे गोड ब्रह्मे  कुटुंब मनालीत मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.

तर या मनाली ट्रीपदरम्यानचा एक सुंदर असा व्हिडीओ सई म्हणजेच गौतमीनं (gautami deshpande)आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती बसमध्ये मामासोबत म्हणजेच अभिनेता सुनील तावडे (sunil tawade) यांच्या सोबत एक सुंदर गाणं गातं आहे. आणि विराजस म्हणजेच आदित्य पाठीमागे बसला आहे. ‘इन हवावोंमे इन फिजावोंमे’ असं हे गाणं आहे. आणि या व्हिडीओखाली ‘bus mai gana to gana padega’ असं मजेशीर कॅप्शनही गौतमीनं दिलं आहे.

मालिकेमध्ये सई हे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे गौतमी देशपांडे. गौतमी ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची छोटी बहीण आहे. गौतमीनं 2018 मध्ये ‘सारे तुझाचं साठी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती अभिनेत्री सोबतचं एक उत्तम गायिका देखील आहे. ती सतत सोशल मीडियावर आपल्या गाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

(हे वाचा:मराठी अभिनेत्रीचा Ice Yoga; VIDEO पाहून ऐन गरमीत गार व्हाल  )

तसेच मालिकेमध्ये आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता आहे विराजस कुलकर्णी. विराजस हा ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

‘माझा होशील ना?’ या मालिकेमध्ये लवकरच मनालीचे हे एपिसोड दाखविण्यात येणार आहेत. मात्र हे व्हिडीओ आणि फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

First published:

Tags: Instagram post, Marathi entertainment, Tv actress, Tv serial