मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा

VIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा

मुंबई, 30 जुलै- मराठी मालिकांमध्ये ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच मालिकेतील कलाकरांनासुद्धा प्रसिद्धी मिळत आहे. डॉक्टर पासून टोण्यापपर्यंत आणि डिंपलपासून चंदापर्यंत सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मालिकेतील कलाकर सतत ऑफस्क्रीन धम्माल करत असतात. आत्ता डॉक्टर(Doctor) आणि चंदाने (Chanda) आपला एक धम्माल व्हिडीओ शेयर केला आहे. सध्या हा व्हिडीओ खुपचं व्हायरल होतं आहे.

झी टीव्हीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. या मालिकेच्या कथानकाने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील डॉक्टर म्हणजेच अजितकुमार देवच्या थरारक कारस्थानांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित होती. मालिकेत डॉक्टरने अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. अनेक निर्दोष महिलांना त्रास दिला आहे. आत्ता यासर्व कट कारस्थानांचा लवकरच भांडा फुटणार आहे. आणि यासोबतचं ही मालिका आपला निरोप घेणार आहे.

(हे वाचा: मीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव)

सध्या मालिकेत अजितकुमारच्या जुन्या प्रेयसीची म्हणजेच चंदाची एन्ट्री झाली आहे. चंदा बेधडक अंदाजाने आणखीनचं उत्कंठा वाढली आहे. हे झालं मालिकेचं मात्र ऑफस्क्रीन या सर्व कलाकरांची धम्माल मजामस्ती चालू आहे. नुकताच चंदा आणि डॉक्टरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये ‘माझा राया’ या गाण्यावर या दोघांनी रील बनवला आहे. मालिकेत डॉक्टरच्या जीवाला घोर करणाऱ्या चंदाचा हा प्रेमळ अंदाज पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

(हे वाचा:'Dhadak girl' जान्हवीचा बोल्ड अंदाज; हॉलिवूड अभिनेत्रीशी होतेय तुलना  )

‘देवमाणूस’ मालिका लवकरच चाहत्यांचा निरोप घेणार आहे. सध्या मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत डॉक्टरचं बिंग फुटणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Zee marathi serial