मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Viju Mane : दसऱ्या मेळाव्याच्या भाषणांवर दिग्दर्शक विजू मानेची प्रतिक्रिया; म्हणाला हे सांगण्यापेक्षा...

Viju Mane : दसऱ्या मेळाव्याच्या भाषणांवर दिग्दर्शक विजू मानेची प्रतिक्रिया; म्हणाला हे सांगण्यापेक्षा...

विजू माने

विजू माने

दसऱ्या मेळाव्याच्या भाषणांवर दिग्दर्शक विजू मानेनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 06 ऑक्टोबर : दसऱ्याला महाराष्ट्राच्या राजकारणार रंगलेला एकच विषय तो म्हणजे दसरा मेळावा. शिवसेनेच्या दोन गटांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे काल मुंबईत झाले. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं भाषण केलं तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण रंगलं. दोन्ही भाषणात एकमेकांवर चांगलीच टीका करण्यात आली, टोले लगावण्यात आले. दोन्ही भाषणं झाली मात्र कोणाचं भाषण कसं झालं? कोणाचं भाषण चांगलं झालं? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. दोन्ही भाषणांची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर दिग्दर्शक विजू माने यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

विजू मानेनं सोशल मीडियावर एक व्यंग्यात्मक पोस्ट शेअर केली आहे ज्यात एक माणूस निवांत झोपलेला दिसत आहे. कोणाचं भाषण कसं झालं याविषयी विजू मानेनं पोस्टमध्ये लिहिलंय, 'स्वत: उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा मला झेपेल ते मी करतो'. विजू मानेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - 'अवघड गणित सोप्पं करून दाखवलं'; विजू माने आणि मुलीचा भन्नाट VIDEO व्हायरल, एकदा पहाच

इतकंच नाही तर विजू मानेनं कॅप्शनमध्ये देखील याविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यानं म्हटलंय, 'माझी झोप मला प्यारी...×$#त गेली दुनियादारी. राजकीय तज्ञ बनणं थांबवा. काही समस्या फार गंभीर असताता त्यामुळे त्या राजकारण्यांवर सोडून दिलेल्या बऱ्या'.

विजू मानेविषयी सांगायचं झालं तर विजू मानेचा पांडू हा सिनेमा प्रचंड गाजला होता. त्यानंतर विजू मानेचा प्रसिद्ध वेब शो 'स्ट्रगलर साला' देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या झी कॉमेडी अवॉर्डमध्येही विजू मानेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

विजू माने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फार जवळचे आणि चांगले संबंध आहेत. नुकत्याच आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमासाठीही विजू मानेंची बरीच मदत झाली होती. आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा विजू मानेचंच नाव सुचवण्यात आले होत पण विजू मानेनं स्वत: या भूमिकेला नकार दिला होता.

First published:

Tags: Maharashtra News, Maharashtra police, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news