मुंबई, 18 एप्रिल : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) यांच एक ट्विट चर्चेत आलं आहे. ‘डबल सीट’, ‘व्हायझेड’ (YZ) ‘आनंदी गोपाळ’(Anandi Gopal) अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर आता त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कांमाच कौतुक करत एक ट्विट केल्याने ते चर्चेत आले आहेत. नुकतचं त्यांनी हे ट्विट केलं आहे.
ट्विट मध्ये त्यांनी लिहील आहे की, “ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!”
ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!
— Sameer Vidwans (@sameervidwans) April 18, 2021
सध्या मुंबईसह संपूर्ण देशभरात कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे पण पश्चिम बंगाल सह काही राज्यात निवडणूकांच वातावरण आहे. तर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या राजकीय संभांचा नेटीझन्सनी चांगला समाचरही घेतला होता. पण आता राहूल गांधी यांनी आपण सगळ्या प्रचार सभा रद्द करत असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाचं दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी कौतुक केलं आहे.
सुगंधा मिश्रानं संकेत भोसलेसोबत साखरपुडा केला? अखेर अभिनेत्रीनंच सांगितलं सत्य
देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर राजकिय पक्षांच्या सभेत प्रंचड गर्दी होत असल्याने राहूल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे, कोविडचं संकट लक्षात घेता, “मी पश्चिम बंगालच्या माझ्या सर्व सभा, रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांनी विचार करायला पाहीजे की अशा राजकीय सभा जनतेसाठी किती धोकादायक आहेत.”
राहूल गांधीच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. अनेक काँग्रेस नेत्यांकडूनही स्वागत करण्यात येत असून ते सर्वांसमोर उदाहरण ठेवत असल्याचंही म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.