Home /News /entertainment /

दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, वर्षभरापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन

दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, वर्षभरापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन

निर्माता, दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav )यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांची आई शुभांगी जाधव यांचे निधन झाले आहे

  मुंबई, 28 मे- निर्माता, दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav )यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांची आई शुभांगी जाधव यांचे निधन झाले आहे. शुभांगी जाधव यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनी स्वत: सोशल मीडिया पोस्ट शेअर करत याबाबतची  (ravi jadhavs mother passes away) माहिती दिली आहे. रवी जाधव यांनी इन्स्टाला त्यांच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की, “आई… 19 जुलै 1948 – 27मे 2022. त्यांच्या आईचे निधन झाल्याची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काहींनी त्यांना धीर द्याचा प्रयत्न केला आहे.
  गेल्या वर्षी 9 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या वडिलांचे म्हणजे हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली होती. रवी जाधव यांनी सोशल मीडियावर वडिलांचा एक फोटो शेअर केला होता. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले, ‘आमचे वडील श्री. हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे शनिवार दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. या कठीण काळात आम्हा जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या आमच्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार..आमचे पप्पा नेहमीच निर्धास्तपणे हसत खेळत रहायचे. आजही ते कासे गावातील श्री देव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरु होऊन छान बागडत असतील.
  रवी जाधव यांचे आई वडील हे डोंबिवलीत राहायला होते. वर्षभरा नंतर लगेच त्यांच्या आईचे निधन झाल्याने जाधव कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या