मुंबई 9 जून : राज्यात पहिल्या पावसाला सुरुवात झाली असून मुसळधार सरी (Heavy rain) बसरत आहे. अधून मधून विश्रांती घेऊन येत असला तरी पावसाचा जोर कायम आहे. नेहमी प्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबईकराचे (Mumbai) हाल होताना दिसले. काही तासांच्या मुसळधार सरींनीच मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे. अनेकांनी आता यावर नेहमीप्रमाणे आरोपप्रत्यारोप करायलाही सुरुवात केली. मराठी दिग्दर्शक केदार शिंदेनीही (Kedar Shinde) यावर आपलं मत मांडलं आहे.
स्पष्टवक्तेपणा आणि निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक केदार शिंदे हे अनेकदा निरनिराळ्या विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. मुंबईची तुंबई केली असा आरोपच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला. त्यामुळे मुंबई तुंबई हा हॅशटॅगही ट्विटरवर वापरला जाऊ लागला.
बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला
यावर बोलताना केदार शिंदे म्हणाले, ‘पावसाला एक अक्कल नाही. 5 मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था #bmc ने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो.. #MumbaiRains #मुंबई-तुंबई’ अशा शब्दांत त्यांनी मुंबईची सध्याची स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.
पावसाला एक अक्कल नाही. ५० मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था #bmc ने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो.. #MumbaiRains #मुंबईतुंबई
— Kedar Shindde (@mekedarshinde) June 9, 2021
पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. मुंबई तसेच उपनगरात अनेक सखल भागांत पाणी साचलं यामुळे सामान्य मुंबईकरांना तसेच बाहेरून मुंबत येणाऱ्या चाकरमान्यांना पुरेसे हाल सोसावे लागले.
Maharashtra: Roads submerged in Mumbai's Parel following heavy rainfall in the city pic.twitter.com/heTm1UAbjl
— ANI (@ANI) June 9, 2021
लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने काही तासांत लोकलही काही ठिकाणी बंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना पहिल्याच पावसाने अतोनात त्रास सहन करावा लागल्यांच चित्र पाहायला मिळालं. याशिवाय मुंबई महानगर पालिकेवर अनेकांनी टीकाही केली. व बीएमसीने सांगितलं होतं त्याप्रमाणे व्यवस्था केली गेली असे ट्वीट्सही अनेकांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.