मुंबई, 9 डिसेंबर : मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे केदार शिंदे. केदार शिंदे कायमच आपल्या चित्रपटांनी लोकांना थक्क करत असतात. ते प्रत्येक चित्रपटात वेगळ्या धाटणीचा विषय घेऊय येत असतात. त्यामुळे त्यांचे चित्रपटांचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. केदार शिंदे सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. वैयतक्तिक आयुष्य आणि कामाच्या अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी शेअर करत असतात. अशातच केदार शिंदेविषयी एक वाईट बातमी समोर आली आहे.
दिग्दर्शक केदार शिंदेचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट शेअल लिहिलं, 'नमस्कार, काल रात्री माझं फेसबुक अकांऊंट हॅक झालं आहे. यामध्ये पर्सनल आणि पेज दोन्हीही हॅक झालंय. त्यामुळे त्या अकाउंटवर माझा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे या दोन्ही अकाउंटद्वारे तुमच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर सावधान. कुठल्याही प्रकारचे रिप्लाय अथवा मेसेज करु नका'.
View this post on Instagram
केदार शिंदे यांनी सगळ्यांनी सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. केदार शिंदेशिवाय यापूर्वीही अनेक कलाकारांसोबत असा प्रकार घडला आहे. अनेक कलाकारंचेही फेसबुक अकाउंट हॉक झाले आहेत. त्यांनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सतर्कता बाळगण्यास सांगितली आहे.
दरम्यान, केदार शिंदे यांनी `अगं बाई अरेच्चा' या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांनी जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले, बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का, खो-खो, श्रीमंत दामोदर पंत अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी मी, गेला उडत, आमच्या सारखे आम्हीच अशी नाटके आणि हसा चकट फू, घडलय बिघडलय, श्रीयुत गंगाधर टिपरे, मधु इथे आणि चंद्र तिथे, सुखी माणसाचा सदरा अशा मालिका दिग्दर्शित केलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.