Home /News /entertainment /

VIDEO: 'नाही जमत म्हणजे नाही जमत...' सिद्धार्थ-मितालीमध्ये नेमकं काय बिनसलं?

VIDEO: 'नाही जमत म्हणजे नाही जमत...' सिद्धार्थ-मितालीमध्ये नेमकं काय बिनसलं?

अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Sidharth Chandekar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी.हे दोघेही सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे कलाकार सतत सोशल मीडियावर आपले रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 एप्रिल-  अभिनेत्री मिताली मयेकर  (Mitali mayekar)  आणि सिद्धार्थ चांदेकर   (Sidharth Chandekar)  ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी.हे दोघेही सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे कलाकार सतत सोशल मीडियावर आपले रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात.चाहत्यांना ही जोडी फारच पसंत आहे. त्यांच्यातील प्रेम पाहून अनेकांना त्यांचं कौतुक वाटतं. परंतु अचानक असं काय झालं की, सिद्धार्थने थेट 'नाही जमत म्हणजे नाही जमत..'असं म्हटलंय. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघेही सतत चाहत्यांसोबत आपलं स्पेशल बॉन्डिंग शेअर करत असतात. हे दोघेही पती-पत्नी कमी आणि मित्रांसारखे जास्त आहेत. त्यामुळेच त्यांचं नातं अनेकांना आवडतं. सिद्धार्थ आणि मिताली दररोज आपले फोटो किंवा काही ना काही रिल्स शेअर करत असतात. त्यांच्या या रिल्सना युजर्ससुद्धा भरभरून प्रेम आणि प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळेच ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरसोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. वास्तविक हा व्हिडीओ एक ट्रेंडिंग रील आहे. या व्हिडीओमध्ये मिताली एका ट्रेंडवर रील बनविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सिद्धार्थ पाठीमागून तिची मस्करी करताना दिसून येत आहे. खरं तर हा इन्स्टावर एक ट्रेंड सुरु आहे. सर्व सामान्य युजर्ससोबतच कलाकारांनासुद्धा या ट्रेंडचं वेड लागलं आहे. यामध्ये ट्रेंडमध्ये कपल्स डोळे बंद करून एकसारखी ऍक्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मिताली नेमकं तेच करत आहे, परंतु पाठीमागे सिद्धार्थ मितालीला साथ देण्याऐवजी तिची मजा करत आहे. असा हा मजेशीर व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थने 'नाही जमत म्हणजे नाही जमत' असं मजेशीर कॅप्शनसुद्धा दिलंय'.
  सिद्धार्थ आणि मितालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तर भरभरून कमेंट्स दिल्याच आहेत शिवाय कलाकार मित्रांनीसुद्धा मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. अभिनेत्री सुखदा खांडेकरने कमेंट करत म्हटलं आहे, 'किती नालायक असशील तू दुष्ट, शिवाय तिने हसण्याच्या इमोजीही शेअर केल्या आहेत. अमृता खानविलकरने कमेंट करत हाहाहाहा असं म्हटलं आहे. मधुरा देशपांडेने 'याला कुचकटपणा म्हणतात निव्वळ' असं म्हटलं आहे. तर गौरी नलावडेने 'मूर्ख मुला' असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ फारच व्हायरल होत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या