उखाणा घेतानाचा आनंदही तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफानच व्हायरल झाला आहे. 'बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगणारी आग' असा एकदमच हटके उखाणा स्वप्नालीनं घेतला.View this post on Instagram
आपल्या जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करायला स्वप्नालीनं उपस्थितांची मनं जिंकली. जोडीदारवरचं खास प्रेम व्यक्त करायला स्वप्नालीनं हा अनोखा उखाणा घेतला. सगळ्या उपस्थितांमध्येही या उखाण्याची चर्चा बरीच रंगली. हेही वाचा ताराराणींचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर; सोनालीचा तडफदार लूक व्हायरल स्वप्नालीची मालिकेत एन्ट्री झाल्यावर या दोघांची मैत्री झाली. काही महिन्यातच आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. दोघं अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचं बोललं जात होतं. आस्तादनंच स्वप्नालीला प्रपोज केलं. स्वप्नालीनं विचार करून वर्षभरानंतर होकार कळवला.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marriage, Serial