• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेता शिव ठाकरेच्या गाडीचा अमरावतीजवळ अपघात; थो़डक्यात वाचला जीव, चेहऱ्याला गंभीर दुखापत

अभिनेता शिव ठाकरेच्या गाडीचा अमरावतीजवळ अपघात; थो़डक्यात वाचला जीव, चेहऱ्याला गंभीर दुखापत

शिव ठाकरे त्याच्या कुटुंबासह प्रवास करत असताना अमरावती जिल्ह्यातील वळगावजवळ हा अपघात झाला.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेच्या (shiv thackeray ) गाडीला अपघात झाला आहे. शिव ठाकरे त्याच्या कुटुंबासह प्रवास करत असताना अमरावती जिल्ह्यातील वळगावजवळ हा  (car accident) अपघात झाला. सुदैवाने, तो आणि त्याचे कुटुंब ठीक आहेत. या अपघतात त्याच्या चेहऱ्याला गंभीर मार दुखापत झाली आहे. शिव ठाकरे  अमरावती वरून अचलपूर कडे जातांना वळगावच्या समोर  त्याच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या कारला मागून टेम्पो ट्रॅव्हलर ने धडक दिली असता शिव ठाकरे यांची कार थेट शेतात पोहचली. सुदैवाने शिव ठाकरे सुखरूप आहे. सोबतच असलेल्या त्याच्या आई व बहिणीला किरकोळ मार लागला आहे. मात्र गाडीचा मागील भाग चकनाचूर झाला आहे. मराठी कलाकार विश्व यांनी यासंबंधी वृत्त दिले आहे. त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. वाचा : VIDEO : साध्या भोळ्या माऊचा स्वत:च्या लग्नात अंजी- पश्यासोबत भन्नाट डान्स! मराठी कलाविश्वातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे. छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’या शोच्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं आपलं नाव कोरलं. शिव ठाकरे जन्म 9 सप्टेंबर 1989 मध्ये अमरावती येथे झाला आहे.
  शिवला डान्सर म्हणून तर सगळे ओळखतात. याशिवाय शिव एमटीव्ही रोडीज राइजिंग शोमध्ये सेमी फायनल पर्यंत पोहोचला. तसेच 2019 मध्ये तो एमटीव्ही शो अँटी सोशल नेटवर्क वर दिसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो.
  Published by:News18 Trending Desk
  First published: