S M L

रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

या आठवड्यामध्ये बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसला घराबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता पुढील आठवडा स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे.

Updated On: Jul 16, 2018 12:33 PM IST

रेशम टिपणीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

मुंबई, ता. १५ जुलै  : या आठवड्यामध्ये बॉस मराठीच्या घरामधून रेशम टिपणीसला घराबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता पुढील आठवडा स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे.  कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांनी प्रत्येक टास्क, नॉमिनेशन खूपच सिरीयसली घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धकांसाठी हा शेवटचा आठवडा असल्याने खूप कठीण असणार आहे. पुष्करला या आठवड्यामध्ये टिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील महाअंतिम फेरीमध्ये पोहचलेला पहिला स्पर्धक ठरला आहे. या आठवड्यामध्ये आस्ताद, स्मिता आणि रेशम मधून कोण घराबाहेर पडेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगलेली दिसत आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते.

 रेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळण आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघा मध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहेमीच चर्चेमध्ये राहिली. परंतु या आठवड्यामध्ये तिला बाहेर जावे लागले. रेशम टिपणीस या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. रेशम टिपणीसला बिग बॉस यांनी एक खास अधिकार दिला ज्यानुसार कोणत्याही एका सदस्याला ती नॉमिनेशन पासून वाचवू शकते आणि रेशम हिने आस्ताद काळेला सुरक्षित केले. आणि म्हणूनच आस्ताद बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या अंतिमफेरीमध्ये पोहचणारा दुसरा स्पर्धक ठरला.

 GRAND FINALE ला फक्त पाच स्पर्धक असणार आहेत त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये अजून एक नॉमिनेशन होणार असे महेश मांजरेकर यांनी घोषित केले. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोणता टास्क मिळेल ? काय घडणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 11:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close