मुंबई, 27 मार्च- आज जागतिक रंगभूमी दिवस आहे. दरवर्षी 27 मार्च रोजी हा दिवस जगभरात जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. कलाकार मंडळींच्या दृष्टीनं हा दिवस सणापेक्षा कमी नाही. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिवाय काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत. अभिनेते किरण माने यांनी देखील अशीच एक आठवण शेअर करत सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सामजिक, राजकिय परस्थितीवर किरण माने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. यामुळचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांची प्रत्येक पोस्ट लक्षवेधी असते. शिवाय अनेकजण त्यांच्या लिखाणाचं कौतुक करताना दिसतात. आज देखील किरण माने यांनी जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत एक पोस्ट केली आहे व सोबत काही फोटो देखील पोस्ट केला आहे.
किरम माने यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !"..काल एका पत्रकारमित्राचा फोन आला, "उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?"'रंगभूमीनं काय दिलं?'- रंगभूमीनं काय दिलं नाही? रंगभूमीनं ओळख दिली..आत्मविश्वास दिला..भवतालाचं, समाजाचं भान दिलं..भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला..उच्च अभिरूचीचं वरदान दिलं...सांस्कृतीक श्रीमंती दिली..रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं !अजून काय पाहिजे?सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
वाचा-'या' अभिनेत्रीमुळं राज कपूर यांना सोडून त्यांची पत्नी राहू लागली होती हॉटेलमध्ये
किरण माने यांचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यातील मायणी गावात झाला. शालेय शिक्षणापासूनच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती, पण त्यांचे जीवन तितके सोपे नव्हते. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.
View this post on Instagram
किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकांची आवड होती आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी किरण ऑटोमोटिव्ह नावाचे दुकान सुरू केले आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस होते. त्यांनी त्यांच्या दुकानात गाड्यांचे तेल विकायला सुरुवात केली, पण नंतर त्यांना कमीपणा वाटू लागला की आपण काय करतो, त्यांच्या आयुष्यात अभिनय आणि नाटकाशिवाय आयुष्य फक्त बकवास आहे.
मग त्यांना पंडित सत्यद्रव कार्यशाळेच्या संदर्भात पेपरमध्ये एक जाहिरात दिसली म्हणून त्यांनी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावले आणि ते पुन्हा कधीही उघडले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment