मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनला आज सुरुवात, कोण असणार या घरात?

पहिल्या सीझनसाठी उषा नाडकर्णी, कश्यप परुळेकर, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे, भूषण कडू, समीर चौघुले, रेशम टिपणीस, मेधा धाडे हे ह्या शो मध्ये असतील अशी चर्चा आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2018 10:16 AM IST

मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनला आज सुरुवात, कोण असणार या घरात?

15 एप्रिल : मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनला आज सुरुवात होतीये. निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या शोच सूत्रसंचालन करतायत. एक घर, 15 स्पर्धक आणि 100 दिवस अशी ह्या शोची कल्पना आहे. पहिल्या सीझनसाठी उषा नाडकर्णी, कश्यप परुळेकर, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे, भूषण कडू, समीर चौघुले, रेशम टिपणीस, मेधा धाडे हे ह्या शो मध्ये असतील अशी चर्चा आहे. आजवर तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली अश्या सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये यशस्वी ठरलेला बिग बॉस हा शो मराठीत यशस्वी ठरतो का ह्याची उत्सुकता आहे.

महेश मांजरेकर ओ राजे, दे धक्का आणि बिग बॉसचे सध्या गाजत असलेल्या शीर्षकगीतावर परफॉर्मन्स  करणार असून याचे नृत्यदिग्दर्शन प्रतिक उतेकर याने केले आहे. शीर्षकगीतामध्ये महेश मांजरेकर यांचा कधी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना मिळत आहे आणि आता बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला देखील असाच वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे यात शंका नाही.

महेश मांजरेकर काच ब्रेक करून स्टेजवर धमाकेदार डांसची सुरुवात करणार आहेत. १५ स्पर्धक आता येणारे १०० दिवस ते कसे एकत्र राहतील, त्यांच्यामध्ये काय काय होईल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...