S M L

कोण होणार कॅप्टन?,सई-रेशममध्ये राडा

रेशम आणि सईमध्ये भरपूर वाद होणार आहे. अगदी राडाच म्हणा ना! बिग बाॅसचं घर आज भांडणानं दुमदुमणार आहे. तसंच मेघा आणि रेशममध्येही भांडण होणारेय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 22, 2018 02:11 PM IST

कोण होणार कॅप्टन?,सई-रेशममध्ये राडा

मुंबई, 22 जून : कलर्स मराठीवरचा बिग बाॅस दिवसेंदिवस रंजक होतोय. आता द ग्रेट डिक्टेटर कार्य बिग बाॅसमध्ये सुरू होतं. काल मेघा आणि इतर प्रजेनं हुकूमशहाविरोधात बंड पुकारलं होतं आणि ते यशस्वी ठरलं. त्यात प्रजा पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकूमशहाचा पुतळा नष्ट करणं, त्याच्या डोक्यावर पाणी ओतणं यात प्रजा जिंकली. हुकूमशाही संपुष्टात आली.

पण आता प्रश्न आहे तो नवा कॅप्टन कोण? बिग बाॅसमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारांना  चाल वाटचाल हे कार्य सोपवलं जाणार आहे. या टास्कमध्ये रेशम आणि सईमध्ये भरपूर वाद होणार आहे. अगदी राडाच म्हणा ना! बिग बाॅसचं घर आज भांडणानं दुमदुमणार आहे. तसंच मेघा आणि रेशममध्येही भांडण होणारेय.

कालच रेशम आणि सई लोकुर यांच्यात खडाजंगी झाली होती. बाथरूममध्ये रेशमच्या केसांचा गुंता पडला होता आणि ते तिनं वेळीच न उचलल्यानं सई भडकली होती.

बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याची चढाओढ ही विजयासाठीच होत आहे. आता जसजसे स्पर्धेचे दिवस कमी होत आहेच तसतसा हा प्रवास आणखी अवघड होत जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 02:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close