मराठी बिग बाॅसमध्ये मेघानं मतं मॅनेज केली होती? मकरंद अनासपुरे समोर आणणार सत्य

कलर्स मराठीवरच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या शोमध्ये अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींसोबत छान गप्पा होतात. यावेळी या शोमध्ये येणार आहेत मराठी बिग बाॅसमधले स्पर्धक.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2018 10:40 AM IST

मराठी बिग बाॅसमध्ये मेघानं मतं मॅनेज केली होती? मकरंद अनासपुरे समोर आणणार सत्य

मुंबई, 9 आॅक्टोबर : कलर्स मराठीवरच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या शोमध्ये अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींसोबत छान गप्पा होतात. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारतो.

किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने ही काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवत आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळते. यावेळी या शोमध्ये येणार आहेत मराठी बिग बाॅसमधले स्पर्धक. याच पहिल्यावहिल्या पर्वाची पहिली विजेती मेघा धाडे, तसेच उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, सई लोकूर, स्मिता गोंदकर यांनी हजेरी लावलीय. या कार्यक्रमामध्ये बिग बॉसच्या या बिनधास्त सदस्यांनी पहिल्यांदाच बेधडक खुलासे केले आहेत.

कार्यक्रमामध्ये गप्पा आणि गोष्टीबरोबर अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले ज्याची उत्तर यांनी दिली आहेत. जसे मेघा धाडेला मकरंद यांनी विचारलं की तू बिग बॉसच्या वेळेस मत मॅनेज केलं होतं, हे खरं आहे का ? तसंच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का ? सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होतं... असं का घडलं ? बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी स्मिताला बिकिनीचा आधार घ्यावासा का वाटला ? याबद्दल स्मितानं काय उत्तर दिलं?

या प्रश्नांची उत्तरं हे सदस्य काय देतील? काय सांगतील? हे तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच या सदस्यांसोबत गाणी ओळखण्याचा खेळ देखील खेळण्यात आला. ज्यावेळेस सईने मकरंद अनासपुरेसोबत डान्स केला.

याबरोबरच मेघाने तिची मुंबईमधील प्रवासाची गोष्ट आणि वेगवेगळे अनुभव सांगितले. सईने राजेश श्रुंगारपुरे याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट सांगितली आहे तर मेघाने किशोर चौघुले यांबाबत किस्सा सांगितला.

Loading...

नवरात्रीत राधिका आणि शनायामध्ये रंगणार स्पर्धा, कोण बनणार किचन क्वीन?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...