मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Veena Jagtap B'day: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगताप झाली 27 वर्षांची...

Veena Jagtap B'day: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगताप झाली 27 वर्षांची...

मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगताप हिचा आज वाढदिवस आहे. वीणा जगताप ही मराठी इंडस्ट्रीमधील  एक चर्चित अभिनेत्री समजली जाते. सतत कोणत्या नं कोणत्या कारणाने वीणा चर्चेत असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 मार्च : मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगताप हिचा आज वाढदिवस आहे. वीणा जगताप ही मराठी इंडस्ट्रीमधील  एक चर्चित अभिनेत्री समजली जाते. सतत कोणत्या नं कोणत्या कारणाने वीणा चर्चेत असते.सध्या ती 'आई माझी काळूबाई'या मालिकेत काम करत आहे.

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेद्वारे तिनं मराठी अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं होतं. या पहिल्याच मालिकेतून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र वीणा खरी चर्चेत आली ते म्हणजे बिग बॉस मराठी च्या सीजन 2 मधून. मराठी बिग बॉसने वीणाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून दिली.

" isDesktop="true" id="527458" >

बिग बॉसमध्ये असताना विणाचं त्यामध्येच कन्टेस्टंट असलेल्या शिव ठाकरे सोबत सूत जुळलं. आणि इथेच त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. बिग बॉस मराठी 2 मधून ही जोडी खूपच प्रसिद्ध झाली होती. सतत सोशल मीडियावर या दोघांबद्दल चर्चा रंगलेली असायची. मात्र काहींनी असं मत व्यक्त केलं हॉट कि हे फक्त प्रसिद्धी साथी केलं जाणार नाटक आहे. बिग बॉस नंतर हे सगळं संपून जाईल. मात्र असं झालेलं दिसलं नाही. बिग बॉस संपल्यानंतर यांच्या प्रेमाला जास्तच रंग चढलेला दिसला. शिव आणि वीणा सतत सगळीकडे एकत्र दिसून येत होते. एकेमेकांसोबत वेळ घालवत होते.

(हे पाहा:तरुणानं मागितली मदत; सोनू सूद म्हणाला, ‘भारत ते नेपाळ पळत जाशील, अन्...’)

वीणाने तर  शिवचं नावसुद्धा आपल्या हातावर गोंदून घेतल होतं. आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. मात्र मध्ये या दोघांच्या विभक्त झालेल्या बातम्यांनी सुद्धा जोर धरला होता.

वीणा जगताप सध्या 'आई माझी काळूबाई ' मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या आधी हे पात्र प्राजक्ता गायकवाड ही अभिनेत्री साकारत होती मात्र अंतर्गत वादामुळे तिनं ही मालिका सोडली आणि त्या जागी वीणाची वर्णी लागली.

First published:

Tags: Bigg boss, Marathi actress