VIDEO : अॅथलेटिक्सवरच्या मराठी सिनेमाचं ट्रेलर लाँच

VIDEO : अॅथलेटिक्सवरच्या मराठी सिनेमाचं ट्रेलर लाँच

हा सिनेमा आहे खेळाडूंवर. भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे यांनी 'रे राया कर धावा'मध्ये काम केलंय.

  • Share this:

मुंबई, ०९ जुलै : काहीतरी मिळवायचं असलं, की अपरिमित कष्ट करावे लागतात.. या प्रवासात अनेक अडथळे समोर येतात. हे अडथळे जो पार करतो, तोच स्वतःला सिद्ध करतो. रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा सिनेमा आहे खेळाडूंवर. भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे यांनी 'रे राया कर धावा'मध्ये काम केलंय.

मानाचा पुरस्कार हुकल्यानं शहरातला एक मोठा खेळाडू नाराज होऊन गावात येतो आणि तिथल्या गुणवत्तेला आकार देऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासठी कशा पद्धतीनं घडवतो, याचं उत्तम चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. अॅथलेटिक्सवरचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.

हेही वाचा

सौंदर्याची मल्लिका मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा, 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं?

खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन

 

मिलिंद शिंदे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. ते सांगतात, ग्रामीण भागात खेळाडू बरेच असतात. फक्त त्यांना संधी मिळावी लागते. सिनेमातून आम्ही हेच दाखवलंय.

First published: July 9, 2018, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading