मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर

'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर

अनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

अनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

अनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

13 नोव्हेंबर : गोवा अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून रवी जाधवचा 'न्यूड' हा सिनेमा परस्पर वगळल्याने त्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर उमटायला लागलाय. अनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

देश परदेशातील सिनेमांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'न्यूड' या सिनेमाने महोत्सवाची सुरूवात होणार होती. ज्युरींनी तसा निर्णयही घेतला होता. मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे दोन सिनेमे वगळण्याचा निर्णय घेतला.याबद्दल न्यूडचा दिग्दर्शक रवी जाधवने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाला IFFIच्या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला असता. असो. वाईट त्या ज्युरींचे वाटते. इतका वेळ देऊन, प्रत्येक चित्रपट काळजीपूर्वक पाहून त्यांचा निर्णय अंतिम नाही. हे उद्वेगजनक आहे. चित्रपट कोणासाठी करायचा? प्रेक्षकांसाठी की मिनीस्ट्रीसाठी? कठीण होत चाललंय सगळं.

रवीच्या या भूमिकेला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि मराठीतील इतर कलाकारांनी याविरोधात आपली भूमिका उघडपणे मांडली.

जितेंद्र जोशी सांगतो, ' यंदा माझा सिनेमा 'व्हेंटfलेटर' या महोत्सवात असूनही मी तिथे हजेरी लावणार नाही. कारण आज रवी आणि ससीधरन यांच्यावर आलेली वेळ उद्या माझ्यावरही येऊ शकते.

दिग्दर्शक उमेश कुलकर्णीनंही याबद्दल आवाज उठवलाय. तो म्हणतो, 'या मुस्कटदाबीविरोधात मराठीतले दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांनी एकत्र यायला हवं. मला तुम्ही तुमचे ई-मेल आयडी पाठवा. आपण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे दाद मागू आणि त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडू.'

रेणुका शहाणेनंही आपली भूमिका मांडलीय. 'ही धक्कादायक बाब! देवेंद्र फडणवीस काहीतरी करा. एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची सुंदर कलाकृती ईफ्फीसाठी निवडून आल्यानंतर अचानक बाहेर काढली जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. आपण ही गळचेपी सहन करायची का..?'

'न्यूड'ला मिळालेल्या वागणुकीबद्दल कलाकारांनी आपली भूमिका तर मांडलीय. पण हा लढा ते किती जोमाने लढतात याकडेही सगळ्यांचे डोळे लागलेत.  कलाकारांच्या भावना पाहून तरी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ताठर भूमिकेत काही फरक पडतो का ते पहायचं.

First published:

Tags: IFFI, Nude, Ravi Jadhav, ईफ्फी, न्यूड, रवी जाधव