मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: 'बहुत खूबसुरत हो'; श्रुती मराठेचा साडी LOOK पाहून चाहते पडले प्रेमात

VIDEO: 'बहुत खूबसुरत हो'; श्रुती मराठेचा साडी LOOK पाहून चाहते पडले प्रेमात

‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती.

‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती.

‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 जुलै-  मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) नेहमीच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. श्रुतीचा नवा फोटोशूट सध्या व्हायरल होतं आहे. यामध्ये श्रुती साडीमध्ये शूट करताना दिसत आहे. श्रुतीच्या या मनमोहक अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा होतं आहेत. श्रुतीचा हा फोटोशूटचं व्हिडीओ (Video) खुपचं पसंत केला जात आहे.

अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये एक फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करताना दिसत आहे. श्रुती साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. हा एक सुंदर इन्स्टाग्राम रील आहे. या व्हिडीओमध्ये लोकप्रिय असं ‘फूल बहारोंse निकला’ हे गाणंसुद्धा वाजत आहे. श्रुती यामध्ये खुपचं सुंदर दिसत आहे. श्रुती नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती सतत आपले विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. श्रुती सतत आपले फोटो शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.

(हे वाचा:'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता; सुशांतच्या चाहत्यांची बायकॉटची मागणी  )

श्रुतीने अलीकडेचं खूप जास्त वेट लॉस केलं आहे. त्यामुळे ती अधिकचं सुंदर आणि हॉट दिसत आहे. श्रुतीमध्ये झालेला हा बदल पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. श्रुती वेस्टर्न आणि पारंपरिक दोन्ही लुकमध्ये खुपचं सुंदर दिसते. ती सतत विविध ड्रेसमध्ये फोटोशूट करत असते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांना घायाळ करतो.

(हे वाचा:'देवमाणूस'...डॉक्टरचा गणपती डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल)

अभिनेत्री श्रुती मराठेने चाहत्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. साउथ चित्रपटातून करियरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने मराठी मनोरंजन क्षेत्रातसुद्धा मोठी लोकप्रियता मिळवली आहे. झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून श्रुतीला खास ओळख मिळाली होती. या मालिकेत श्रुतीने एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. जी आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलाच्या प्रेमात पडते. ही मालिका दर्शकांना खुपचं पसंत पडली होती. त्याचबरोबर श्रुतीने स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई 2’ मध्येसुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment