मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर; शेयर केला नवा PHOTO

बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर; शेयर केला नवा PHOTO

‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून भाग्यश्रीने मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून भाग्यश्रीने मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून भाग्यश्रीने मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 जुलै- मराठमोळी अभिनेत्री (Actress) भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) नेहमीचं आपल्या बोल्ड एंड बिनधास्त लुकने सर्वांनाचं घायाळ करत असते. तिचा बोल्ड अंदाज पाहून सर्वच लोक अवाक् होतात. भाग्यश्री आपल्या हॉट अंदाज अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतो. भाग्यश्री सतत आपल्या सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेयर करत असते. नुकताच भाग्यश्रीने एक नवा फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये सुद्धा ती खुपचं स्टाईलिश आणि बोल्ड दिसत आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. ती सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये झळकली होती. त्यांनतर भाग्यश्रीने मराठी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

त्यांनतर भाग्यश्रीने ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा मराठी चित्रपट केला होता. आणि नंतर आलेला ‘पाटील’ हा चित्रपट बराच चालला होता. यामधील भाग्यश्रीच्या अभिनयाचं कौतुकदेखील झालं होतं. छोट्या पडद्यावरून थेट चित्रपटांकडे वळत भाग्यश्रीने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.भाग्यश्रीला मराठीतील एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री समजलं जातं. तिच्या प्रत्येक लुकवर चाहत्यांच्या नजरा असतात.

(हे वाचा: KGF Chapter 2 च्या टीजरने बनवला नवा रेकॉर्ड; मिळाले तब्बल इतके व्यूज)

इतकचं नव्हे तर, मराठमोळ्या भाग्यश्रीने साऊथ चित्रपटांतसुद्धा काम केलं आहे. ‘चिकती गदीलो चिताकोटूडू’ या साऊथ चित्रपटात ती झळकली होती. यामध्ये ती खुपचं बोल्ड अंदाजात दिसून आली होती. पहिल्यांदाच आपला बोल्ड अंदाज दाखवत तिने सर्वांनाचं चकित केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत ‘बिग बॉस 14’ मधील प्रसिद्ध स्पर्धक आणि अभिनेत्री निक्की तांबोळीसुद्धा होती. शिवाय भाग्यश्री बॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावत आहे.

(हे वाचा: Cannes Film Festival 2021 : पाहा पुरस्कार विजेत्यांच्या नावाची संपूर्ण यादी)

भाग्यश्री सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपले हॉट फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असतो. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. असाच एक बोल्ड फोटो नुकताच भाग्यश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment