Home /News /entertainment /

'बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन जाते.....' विशाखा सुभेदारची पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर 'ती' पोस्ट चर्चेत

'बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन जाते.....' विशाखा सुभेदारची पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर भाष्य केले आहे. पुण्यातील बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांमधील अस्वच्छता आणि दुर्गंधी याविषयी तिनं जाहीर मत मांडले आहे.

    मुंबई, 18 मे- अभिनेत्री विशाखा सुभेदार (  vishakha subhedar ) हिने नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर भाष्य केले आहे. पुण्यातील बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांमधील अस्वच्छता आणि दुर्गंधी याविषयी तिनं जाहीर मत मांडले आहे. तिथे प्रयोग करणे कलाकारांना जड जात असल्याचे ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हंटली आहे. एवढेच नाही तर माध्यमांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती देखील तिच्याकडून करण्यात आली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. नेमकी काय म्हणाली आहे विशाखा? विशाखा सुभेदारच्या 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाचा नुकताच प्रयोग पार पडला. यावेळी झालेला त्रास तिने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहून व्यक्त केला. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे. विशाखानं म्हटलं आहे की, बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे ला " कुर्रर्रर्रर्र "चा प्रयोग झाला. सातत्याने गंधर्व बद्दल बातम्या कानावर येत आहेत.. बांधकाम करायचं आहे.. पण म्हणून आत्ता जे नाटकासाठी वापरात येत आहेत त्याची काळजी घ्यायला नको का? 'बालगंधर्व.. (balgandharva) जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो. मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आरसे डागळलेले.. Makeup box ठेवायला त्या खालचा कट्टा जेमतेम, बसायला "खुर्च्या" नुसत्या म्हणायला.. चारपाय आणि बुड टेकायला एक फळी प्लास्टिक ची इतकीच तीची खुर्ची म्हणून ओळख.. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था.. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही.. वाचा-अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाने दिला 'हा' निर्णय 'आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणाच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत...? बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते. प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची.काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत...!' 'आणि ac ची सोय.. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं...इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बर ह्याबद्दल तक्रार करावी तर, तर तिथले कर्मचारी म्हणतात.. कीं तो स्लोच आहे.. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय. श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ...timming साधायच, कपडे बदल, ही तारेवरची कसरत असते.. 'घामामुळे कपडे चिकटलेले असतात.. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंगची वेळ बदलते.. अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही. वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा.भाडे मात्र नीट आकारलं जातं.' वाचा-Cannes 2022: परिकथेची परी! उर्वशी रौतेलाच्या रेड कार्पेट LOOK ची चाहत्यांना भुरळ 'आण्णाभाऊ साठे... (annabhau sathe rang mandir ) 'तिथेही तेच..अस्वच्छ बाथरूम, अंधारलेले भकास green रूम..,AC ची बोंब, आणि तिथेले स्पीकर गायब झालेले.. थिएटरचे स्पीकर चोरीला गेले.. त्यामुळे त्याचा भुर्दंड पुनः कंपनीला. Lights ची सोय फक्त एकाच पट्टी मधले ले lights चालू स्थितीत... बाकी नाहितच.प्रयोगनंतर जेवायला घेतो आम्ही अहो.. साधं बसायला खुर्च्या नसतात.. जिथे जेवायला घेणार तिथे मोडक्या लाकडी फळ्या एकावर एक टाकलेल्या.. त्यावर बसायला गेलो तर कुल्ले सोलवटुन निघतील. काहीच सोय नाही. आणि सगळ्या तुटक्या मोडक्या, गायब सोयीसाठी साठी भाडं मागितलं जातं. अतिशय निंदनीय आहेत.' 'आपली परंपरा टिकविण्यासाठी. रंगभूमी टिकून राहावी, थोडेच पैसे मिळवावे म्हणून, म्हणून आम्ही सगळे कलाकार जीवाचं रान करतो. मग तिथले व्यवस्थापक, जे आहे त्याची डागडुजी करून का घेत नाहीत..आहे, ते जपत का नाही? जाऊदे,आत्ता काय मोडायचं आहे. म्हणून दुर्लक्ष करणारी कर्मचारीं मंडळी. ह्या सगळ्या च काय करायचं? आत्ता कोकण गोवा दौरा केला.. मग त्यामानाने तिथली अवस्था बरी आहे. उन्हाळा कडक आहे यंदा .हे उत्तर मात्र सगळीकडे सारखंच. ( आत्ता खरंतर ही post खरंच चर्चेत यावी... असं मनापासून वाटतं.. माझ्या सगळ्या मीडिया दोस्ताना विनंती.)' अशी विशाखाने आपल्या पोस्ट मधून व्यक्त केली आहे. आता विशाखाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरातील दुरवस्थेवर भाष्य केले होते.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Pune

    पुढील बातम्या