मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

उसगांवकर भगिनी पाहिल्यात का? अभिनेत्री बहिणीपेक्षाही आहेत सुंदर

उसगांवकर भगिनी पाहिल्यात का? अभिनेत्री बहिणीपेक्षाही आहेत सुंदर

वर्षा उसगांवकर यांच्या बहिणी दिसायला तितक्याच सुंदर आहेत. त्या लाइमलाइटपासून दूर आहेत आणि पाहा कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत..

वर्षा उसगांवकर यांच्या बहिणी दिसायला तितक्याच सुंदर आहेत. त्या लाइमलाइटपासून दूर आहेत आणि पाहा कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत..

वर्षा उसगांवकर यांच्या बहिणी दिसायला तितक्याच सुंदर आहेत. त्या लाइमलाइटपासून दूर आहेत आणि पाहा कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत..

  मुंबई 2 जून : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आजही प्रेक्षकांच्या तितक्याच आवडत्या अभिनेत्री आहेत. 90 च्या दशकातील त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. मराठी शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वर्षा सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  या मालिकेतून प्रेक्षकाचं मनोरंजन करत आहेत. वर्षा यांना दोन सख्या बहिणी देखिल आहे. ज्या चित्रपटसृष्टीत नसल्यामुळे त्यांची ओळख कधीच समोर आली नाही. पण त्या वर्षा यांच्याइतक्याच किंबहूना त्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत. वर्षा यांना तोषा आणि मनिषा अशा दोन बहिणी आहेत. तोषा कुराडे या एक डॉक्टर आहेत. त्या गोव्यातील पणजी या ठिकाणी डॉ. तोषाज लॅबोरेटरी आणि मेडिकल सेंटर चालवतात. त्यांची दुसरी बहीण म्हणजेच मनिषा तारकर या एक उद्योजिका आहेत. ठरलं तर! 'हे' असणार बाळाचं नाव, श्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा गोव्यात माईनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स अशा कंपन्यांचा कारभार त्या सांभाळतात.
  वर्षा यांच्याइतक्याच सुंदर असणाऱ्या त्यांच्या बहिणींनी चित्रपट क्षेत्र निवडलं नव्हतं तर इतर क्षेत्रात करिअर केलं. त्या कधीही कॅमेऱ्यसमोर आलेल्या दिसल्या नाहीत. वर्षा यांनी संगीतकार रवीशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मा यांच्याशी 2000 साली विवाह केला होता. तीनही बहिणी आपापल्या क्षेत्रात चांगल नाव कमावताना दिसत आहेत.

  VIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल

  1987 मध्ये ‘गम्मत जम्मत’ चित्रपटातून वर्षा यांनी आपल्या करीअरला सुरुवात केली  होती. यानंतर अनेक हीट चित्रपटांत त्या दिसल्या. सध्या त्या हिंदी तसेच मराठी मालिकांत दिसत आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्या आता दिसत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या