मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक, गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक, गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

अच्युत उसगावकर यांचा गोव्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

अच्युत उसगावकर यांचा गोव्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

अच्युत उसगावकर यांचा गोव्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

    पणजी, 16 जून : मराठी चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा असा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अच्युत उसगावर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री होते. अच्युत उसगावकर यांचे आज सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले आहे. अच्युत उसगावकर यांचा गोव्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार राहिलेले उसगावकर 1977 ते 79 दरम्यान गोव्यात मंत्री होते. अच्युत उसगावकर यांच्यावर दुपारी चार वाजता गोव्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अच्युत उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वुद्धापकाळानं अलिकडे ते आजारी होते. त्यांच्या निधनानं गोव्यातील विविध समाज घटकांतून दु:ख व्यक्त केले जात आहे. अच्युत उसगावकर हे भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या