Home /News /entertainment /

जेव्हा सेटवर पडतो पाऊस, 'बॉस माझी लाडाची' मालिकेच्या कलाकारांना आवरत नाही 'ही' हौस

जेव्हा सेटवर पडतो पाऊस, 'बॉस माझी लाडाची' मालिकेच्या कलाकारांना आवरत नाही 'ही' हौस

मराठी मालिकांचे कलाकार जितके व स्क्रीन उत्तम अभिनय करतात तितकीच ऑफ स्क्रीन धमाल करताना दिसतात. असाच काहीसा अनुभव(Boss Mazi Ladachi) ‘बॉस माझी लाडाची’ मालिकेच्या सेट्वरुन शेअर केला जात आहे.

  मुंबई 15 जून: सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi) या मालिकेची सध्या बरीच चर्चा आहे. मालिकेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत असून यातल्या कलाकारांचं आणि पात्रांचं खूप कौतुक होताना दिसत आहे. कायमच रागावलेली खडूस बॉस आणि तिच्या कचाट्यात अडकलेला तिचा एम्प्लॉयी नवरा यांची ही धमाल बघायला बरीच मजा येते. या मालिकेच्या सेट्वरुन एका अभिनेत्रीने केलेला एक विडिओ फारच viral होताना दिसत आहे. वर्ष दांदळे (Varsha Dandale) या अभिनेत्रीने बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिकेत पदार्पण केलं आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री ‘वच्छी आत्या’ या तिच्या पात्रासाठी आणि इतर अनेक भूमिकांसाठी बरीच प्रसिद्ध आहे. बॉस माझी लाडाची या मालिकेत सुद्धा त्यांचं एकदम झकास पात्र आहे. या मालिकेच्या सेटवर पावसाने अचानक हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसानं शूटिंग तर थांबलं पण बाहेर सेटवर पडणारा पाऊस बघून या अभिनेत्रीला चक्क गाण्याचा मोह आवरता आला नाही. या संबधी एक विडिओ पोस्ट करत त्यांनी धमाल कॅप्शन दिल आहे. या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे, “सेट वरचा पाऊस.. आणि मेकअप रूम मध्ये गाण्याची हौस 😂😂😂” पावसात जिथे अनेकांना चहा आणि गरमागरम भजी खावीशी वाटते तिथे मात्र वर्ष यांना गाणं गाण्याचा मूड झाला आहे. त्यांच्या आवाजचं सुद्धा चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
  बॉस माझी लाडाची या मालिकेच्या सेटवर सध्या धमाल चालू असून सेटवरच्या या गमती जमती अभिनेत्रीने व्हिडिओद्वारे शेअर केल्या आहेत. यात त्यांचे सहकलाकार सुद्धा त्यांच्या सुरत सूर मिसळत गाणं म्हणताना दिसत आहेत. जब घुंगरू सी बजती है बुंदे हे प्रसिद्ध गाणं गाताना वर्षा यात दिसत आहेत. वर्ष या अनेक दिवस सगळ्याच कामापासून लांब होत्या. त्यांच्या झालेल्या गंभीर अपघाताने विश्रांतीसाठी त्या बरेच दिवस घरी होत्या. त्यांनी त्यांच्या अपघाताची माहिती सुद्धा त्यावेळी इन्स्टाग्रामवरून शेअर केली होती. या अभिनेत्रीचा उत्साह आणि जोश दांडगा आहे. तिने लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती आणि त्यांना स्पोर्ट सुद्धा केला होता. आता एका मोठ्या काळानंतर त्यांना मालिकेत बघून त्यांचे चाहते खुश झाले आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Tv actress, TV serials

  पुढील बातम्या