Home /News /entertainment /

'अच्छे दिन आयेंगे…', वच्छी अत्याच्या 'त्या' पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

'अच्छे दिन आयेंगे…', वच्छी अत्याच्या 'त्या' पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा दांदळे (varsha dandale) यांचा गंभीर अपघात झाला होता. वर्षा दांदळे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 16 डिसेंबर- काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा दांदळे  (varsha dandale) यांचा गंभीर अपघात झाला होता. आता वर्षा दांदळे यांची तब्येतीत सुधारणा होताना दिसत आहे. वर्षा दांदळे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्यांनी त्यांचा एक कोलाज केलेला फोटोही शेअर केला आहे.'येतील लवकरच चांगले दिवस , फक्त गंमत करतेय. दिवस चांगलेच आहेत. आरामाचे… शांततेचे… आपल्या प्रियजनांसोबत…स्वप्नातील गप्पा मारण्याचे. चालणे हेच जीवन आहे आणि थांबलात की संपलात,' अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. सध्या वर्षा दांदळे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा : प्रार्थना बेहेरेने श्रेयश तळपदेच्या सीक्रेटची कशी केली पोल, पाहा.. वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली.
  पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ झाल्या. स्वामी समर्थांच्या कृपा-सिंधू या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. शिवाय पाहिले न मी तुला मालिकेत उषा मावशी म्हणून गोड. प्रेमळ सासूचीही त्यांची भूमिका सर्वांना आवडली. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv actress, Zee marathi serial

  पुढील बातम्या