मुंबई, 26 ऑक्टोबर : मराठोमोळी अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. उर्मिलाने या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. तिने तिच्या मुलासोबत काही गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मुलासोबत तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती घरच्या साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तसेच बाळाची देखील नुकतीच आंघोळ झालेली दिसत आहे. तिने तिच्या बाळाला उचलून घेतले आहे. फोटोमध्ये आई आणि बाळ दोघेही खुपच गोड दिसत आहेत.
वाचा : 'Sukh Mhanje Nakki Kay Asta' मधील 'तो' अवघड सीन कसा शूट झाला त्याचा VIDEO पाहाच!
उर्मिलाने बाळाचे फोटो शेअर करत कॅप्शन म्हटले आहे की, 13th week of Postpartum:आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की,सर्वात कष्टाचा, सर्वात जास्त शिकवणारा, सर्वात कळकट्ट (आंघोळ नाही, केसांची दशा, कोरडी त्वचा) सर्वात जास्त पोटाचा घेर असलेला,आयुष्याचा काळ..माझा सर्वांत आनंदी काळ असेल ♥️...अशी पोस्ट तिन करत बाळाचे गोंडस असे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
उर्मिलाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. अनेक जण तिच्या बाळाचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने तुमचा ससा तुमच्यासारखा दिस आहे..अशी कमेंट केली आहे.तर दुसऱ्याने आई आणि बाळ गोड दिसते आहे अशी कमेंट केली. तिच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. यासोबतच हा फोटो मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील केला जात आहे.
वाचा : ''आता रडायचं नाही तर ..'' ; ओमच्या बॅड बॉय लुकवर नेटकऱ्यांच्या रावडी कमेंट
उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यासोबतच डोहाळे जेवणाचे अनेक फोटो व एक छानसा व्हिडीओ देखील तिन सोशल मीडियावर शेअर केला होता. उर्मिलाला उर्मिलाला सर्वजण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतात मात्र ती एक मराठीमधील प्रसिद्ध अशी युट्यूबर देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती ब्यूटी, लाईफस्टाईल अशा विविधा विषयावर माहिती शेअर करत असते व काही टिप्स देखील देत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress