Home /News /entertainment /

'एवढं काय हिच्या प्रेग्नेन्सीचं कौतुक' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

'एवढं काय हिच्या प्रेग्नेन्सीचं कौतुक' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

उर्मिलाने काही महिन्यांपूर्वीचं आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती.तेव्हापासून ती सतत आपले बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.

  मुंबई, 17 जुलै-  गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हेमांगी कवीच्या पोस्टवर अनेक माध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अभिनेत्रीला पाठींबा दिला आहे, तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. अशातच आत्ता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ट्रोलर्सची (Trollers) चांगलीचं कानउघडनी केली आहे. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimabalakar) लवकरच आई होणार (Pregnancy) आहे. ती सतत बेबी बंपसोबत आपले फोटो शेयर करून चाहत्यांना अपडेट देत असते. त्यामुळे काही युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. जाणून घेऊया काय नेमकं घडलं आहे.
  अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते. तीचं यूटयूब चेनेलसुद्धा आहे. यामधून ती चाहत्यांना विविध गोष्टींवर सोप्या सोप्या टिप्स देत असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर बरीचं लोकप्रिय आहे. उर्मिलाने काही महिन्यांपूर्वीचं आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. तेव्हापासून ती सतत आपले बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. मात्र हे काही युजर्सनां रुचलेलं दिसत नाही. काही महिला ट्रोलर्सनेचं तिला यावरून ट्रोल केल्याचं तिला दिसून आलं आहे. आत्ता तिने एक खास पोस्ट शेयर करत त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. (हे वाचा:  भूषण कुमार बलात्कार प्रकरणामध्ये T-Series ने दिली पहिली प्रतिक्रिया) काय आहे उर्मिलाची पोस्ट- आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’ मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या, या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा ९ वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे’ अशी पोस्ट लिहित उर्मिलाने त्या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. उर्मिलाने मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने मराठीतील सिंगिंग शो ‘संगीत सम्राट’ होस्ट देखील केला आहे. यामध्ये तिच्यासोबत रोहित राऊतसुद्धा होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या