अभिनेत्री उर्मिला कोठारे एक उत्तम अभिनेत्री आहे. इतकचं नव्हे तर ती एक गोड गळयाची अभिनेत्री आहे. अर्थातच तिला गाण्याची आवड आहे. उर्मिला सतत आपल्या सोशल मीडियावरून काही ना काही शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. मग ते आपले आणि पती आदित्य कोठारेचे सुंदर फोटो असो किंवा लेक जिजाचे गोड व्हिडीओ असो. या सर्व माध्यमातून उर्मिला आपल्याला भेटत असते. (हे वाचा: शिव ठाकरे-शिवानी बावकरमध्ये खुललं प्रेम; वाचा VIRAL फोटोमागचं सत्य ) आज उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्रामवर असाच एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपला सुरीला अंदाज सादर करत आहे. उर्मिला या व्हिडीओमध्ये ‘इजाजत’ चित्रपटातील सदाबहार गीत ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ गात आहे. उर्मिलाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ‘मी पहिल्यांदाच तुमच्यासाठी संपूर्ण गीत सादर करत आहे’. उर्मिलाचा हा सुरीला अंदाज सर्वांनाचं भावला आहे. युजर्सने कमेंट्स करत उर्मिलाचं कौतुक केलं आहे. तर हे इमोशनल गाणं एकून काही युजर्स भावुकसुद्धा झाले आहेत. (हे वाचा:राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल ) अभिनेत्री उर्मिलाने टाईमपास, दुनियादारीसारख्या अनेक सुंदर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच उर्मिलाने अभिनेता आदित्य कोठारेशी लग्न केलं आहे. अर्थातच ती ज्येष्ठ अभिनेता महेश कोठारे यांची सून आहे. सध्या ती खूप आनंदाने आपलं वैवाहिक जीवन जगत आहे. उर्मिला आणि आदित्यला जिजा नावाची एक गोड मुलगीसुद्धा आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.