मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही '#BanLipstick'; तेजस्विनी पंडितच्या VIDEO ने उडाली खळबळ

'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही '#BanLipstick'; तेजस्विनी पंडितच्या VIDEO ने उडाली खळबळ

राठमोळी अभिनेत्री   (Marathi Acrtress)  तेजस्विनी पंडित   (Tejaswini Pandit)  नेहमीच आपल्या बिनधास्त आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असते. आजही अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र आजचं कारण फारच वेगळं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 डिसेंबर-   मराठमोळी अभिनेत्री   (Marathi Acrtress)  तेजस्विनी पंडित   (Tejaswini Pandit)  नेहमीच आपल्या बिनधास्त आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असते. आजही अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र आजचं कारण फारच वेगळं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ (Video)  शेअर करत आपलं लिपस्टिकला समर्थन नसल्याचं   (Ban Lipstick)  म्हणत सर्वांनाच संभ्रमात टाकलं आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या पोस्टमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते. अभिनेत्री कधी आपल्या फोटोमुळे तर कधी व्हिडीओमुळे चाहत्यांच प्रेम मिळवत असते. मात्र आज अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत सर्वानाच चकित केलं आहे. तेजस्विनीने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या ओठांना लिपस्टिक लावते. आणि नंतर ती पुसून टाकते. आणि म्हणते 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक'. तसेच तिने आपल्या पोस्टमध्ये #BanLipstick हा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. फक्त चाहतेच नव्हे तर तिचे कलाकार मित्र सुद्धा गोंधळून गेले आहेत. मराठी डिरेक्टर संजय जाधव यांनी कमेंट करत 'क्या हुआ भाई' असं म्हटलं आहे. तर एका युजरने हा सर्व एखाद्या प्रमोशनचा भाग असेल असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने नवीन चित्रपट येत असेल, असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने हे काय नवीन असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने पुसायचीच होती तर लावली कशाला असा प्रश्न केला आहे. तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे, सगळ्या चित्रपटांमध्ये तर सर्वात जास्त लिपस्टिक तू लावतेस'. अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रींच्या या व्हिडिओवर येत आहेत.

मेकअप आणि त्यातल्या त्यात लिपस्टिक हा मुलींच्या जिव्हळ्याचा विषय समजला जातो. प्रत्येक स्त्रीला नटनं-तयार होणं फारच आवडतं. अनेक महिला मुली आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा लूक आणि फॅशन सेन्स फॉलो करत असतात.मात्र एका अभिनेत्रीनेच लिपस्टिक बंद सारखा संदेश दिल्याने महिलावर्गसोबतच सर्व चकित झाले आहेत. मात्र अभिनेत्रीने हा व्हिडीओ का बनवला. त्या मागे नेमकं काय कारण आहे. किंवा लिपस्टिक का बॅन या प्रश्नच उत्तर अजूनही मिळालेलं नाहीय. अभिनेत्रीने याबद्दल आजू कोणताच खुलासा केलेला नाही.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment