• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • लाडकी सून तेजश्री प्रधान दिसणार 'आरजे'च्या भूमिकेत

लाडकी सून तेजश्री प्रधान दिसणार 'आरजे'च्या भूमिकेत

सुश्रृत भागवत दिग्दर्शित या सिनेमात तेजश्री आणि उमेश कामत हे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात आरजेची भूमिका करण्यासाठी तेजश्रीने खास मेहनत घेतली आहे.

  • Share this:
24 फेब्रुवारी : 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने माईक हातात घेतलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा सिनेमातही माईकसोबत दिसणारे. 'असेही एकदा व्हावे' या तिच्या आगामी सिनेमात ती एका रेडिओ जॉकीची भूमिका करतेय. तिच्या या नव्या भूमिकेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सुश्रृत भागवत दिग्दर्शित या सिनेमात तेजश्री आणि उमेश कामत हे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात आरजेची भूमिका करण्यासाठी तेजश्रीने खास मेहनत घेतली आहे. यासाठी तीने आरजेचा एक महिन्याचा खास कोर्सही केला आहे. तेजश्री आणि उमेशनचा हा सिनेमा म्हणजे एक आगळी वेगळी प्रेमकथा आहे. आजवर आदर्श सून म्हणून वावरलेली तेजश्री आरजे बनूनही प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
First published: